गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शनिवार, 4 मे 2019 (10:30 IST)

मूलांक 4 अर्थात विशाल व्यक्तिमत्व असणारा

4 हा अंक अतिविचारशील व रचनात्मक मूलांक आहे. या अंकाचा स्वामी हर्षल असून, याला इंग्रजीमध्ये युरेनस असं म्हटलं जातं. हर्षल हा ग्रह अतिविचार करणारा ग्रह मानला जातो. नवे काही विचार किंवा परंपरा सुरू करण्यात हर्षलचा हातखंडा असतो.   
 
स्वरूप : 4 हा मूलांक कधी खूप आकर्षक तर कधी अति अनाकर्षक वाटतो. छान मूडमध्ये या व्यक्ती आकर्षक दिसतात. 
 
व्यक्तिमत्व: 4 हा मूलांक असलेल्या व्यक्तींचे एकूण व्यक्तिमत्व विशाल असते. पण कधी कधी हे अगदी याउलट निदर्शनास येतात. यांचे स्वतचे असे एक वेगळेच व्यक्तिमत्व असते. कुठल्याही गोष्टीकडे पाहताना हे एका वेगळ्या नजरेतूनच पाहतात. 4 मूलांक असलेल्या व्यक्ती अति विचारशील आणि अतिकल्पनाशील असतात. अर्थात बऱ्याचदा विरोधकही यांचे विचार नंतर स्वत मान्य करतात. परंपरा आणि कायदा सुव्यवस्था यांच्यासंदर्भात अनेक मतभेद होऊ शकतात.
 
यांचे जीवनही अस्थिर असून, कधी हे राजाप्रमाणे जगतात, तर कधी रंकाप्रमाणेही यांना जगायला लागते. यांच्या आर्थिक स्थितीमध्येही झपाटय़ाने बदल होत असतात. कधी श्रीमंत तर कधी गरीब असे बदल यांच्यात बऱ्याचदा दिसतात. नवीन विचार आणि नवीन काही उपक्रम करण्यात हे कायम अग्रेसर असतात. यांचे जीवन सामान्य कधीच नसते, सतत काही ना काही मोठय़ा घटना किंवा गोष्टी यांच्या आयुष्यात घडत असतात. यांच्या डोक्यातून अनेक नव्या सुपीक कल्पना सतत जन्म घेत असतात. परंतु याचा लाभ मात्र यांना स्वतला होत नाही. दुसऱ्या व्यक्तींना मात्र यांच्या विचाराचा खूप फायदा होतो. ४ मूलांक असणाऱ्यांनी भविष्यासाठी बचत ही करायला हवी. त्याचबरोबर जवळ असलेल्या धनाचा संचय व्यवस्थित करायला हवा. नाहीतर यांना संकटाला सामोरं जावं लागेल. 
 
स्वभाव: घराबाहेरील व्यक्तींसाठी या व्यक्ती एकदम मधुर आणि विनोदप्रिय अशा असतात. पण घरातील व्यक्तींना मात्र या व्यक्ती अतिशय कठोर भासतात. शत्रूलाही मदत करण्यात हे मागेपुढे पाहात नाहीत. त्यामुळे तो शत्रू हा त्यांचा कायमचा शत्रू राहात नाही. 
 
गुण: दुसऱ्यांच्या दुखामुळे यांना खूप त्रास होतो. विचारशीलता हा यांचा गुण ठरतो तर अतिविचार हा यांच्याकरता अवगुणही ठरतो. अतिविचार करण्यामुळे ते स्वतची कार्यक्षमता गमावून बसतात.
 
शुभ तारीख: 1, 2,4, 10, 11, 13, 19, 20, 22, 28, 29, 31 या प्रत्येक महिन्याच्या शुभ तारखा आहेत. यादिवशी महत्त्वाची कार्ये करावीत. 
 
अशुभ तारीख: 3, 9, 12, 18, 21, 27 या तारखांना महत्त्वाचे कार्य करू नये. 
 
भाग्यशाली रंग: नीळा, हिरवा, सफेद, राखाडी
 
भाग्यशाली दिवस: शनिवार, बुधवार
 
भाग्यशाली र्वष: 10, 11, 13, 14, 19, 20, 28,29, 31, 37,38, 40, 41,46, 47, 50 
 
भाग्यशाली मंत्र- 
 
ॐ वं वरद मुत्तर्यै नम।
ॐ ही घृणि सुर्याय आदित्य श्री श्रीं श्रीं।
ॐ ऐं हीं क्लीं श्रीं क्लीं हीं ऐं ॐ