बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

ॐ मंत्र जपा, ताण पळवा

ॐ मंत्र जपल्याने शारीरिक समस्या दूर होतात आणि तणावापासून मुक्ती मिळते. जाणून घ्या 10 गोष्टी:
* शांत जागा निवडा.
* सकाळी लवकर उठून जप केल्याने दिवस चांगला जातो. सकाळी शक्य नसल्यास रात्री जप करा.
* ॐ जपण्यासाठी कोणत्याही देवाची मूर्ती, चित्र, धूप-उदबत्ती किंवा दिव्याची गरज नाही.
* मोकळी जागा जसे बाग, गच्ची किंवा मैदानावर जप करणे उत्तम परंतू हे शक्य नसल्यास खोलीत जप करू शकता.
* स्वच्छ जागेवर जमिनीवर आसन घालून जप करावा. पलंग किंवा सोफ्यावर बसून जप करू नये.
* ॐ चे उच्चारण मोठ्या आवाजात करावे.
* स्वच्छ आसनावर पद्मासन अवस्थेत बसा, डोळे बंद करून पोटातून आवाज काढत जोराने ॐ उच्चारण करा. ॐ * स्वर जितका लांबवता येईल लांबवा. श्वास भरल्यावर थांबा आणि ही प्रक्रिया पुन्हा करा.
* या मंत्राचा नियमित जप केल्याने तणावापासून मुक्ती मिळते.
* जप दरम्यान टीव्ही, म्युझिक सिस्टम बंद करा. जप करताना जवळपास हल्ला नसावा असे प्रयत्न करा.