शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

घुबड पहाणे किंवा आवाज ऐकणे, भविष्यातील 12 चिन्हे जाणून घ्या

बर्‍याचदा घुबडांचा आवाज एखाद्या अपशकुनाशी संबंधित असतो, परंतु प्रत्येक वेळी असे होत नसत. घुबडांचा आवाज काय सूचित करतो ते जाणून घेणे अधिक योग्य ठरेल. तथापि, अशा धारणेत विज्ञान शोधणे अवघड असत तरी परंपरा आणि श्रद्धेच्या आधारावर काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहे- 
 
1. जनुश्रुतीच्या म्हणण्यानुसार घुबड रडण्याची आवाज गंभीर संकटाची चाहूल असते.
 
2. घुबडाची आवाज रात्रीच्या पहिल्या प्रहर, द्वीतीय किंवा चतुर्थ प्रहरात ऐकू आल्यास इच्छा पूर्ण होते. अर्थात लाभ प्राप्ती आणि राजयोग देखील असू शकतात.
 
3. विश्वासानुसार घुबडांचा आवाज एकाच दिशेने वारंवार येणे, दिसणे अशुभ असतं. संकटाची चाहुल असते ‍किंवा आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते.
4. घुबड वारंवार उच्च स्वारात ओरडत असल्यास हानी होण्याचे संकेत समजावे.
 
5. रात्री प्रवासासाठी निघताना घुबड प्रसन्न मुद्रेत मध्यम स्वरात आवाज करत असेल तर हे शुभ संकेत समजावे.
 
6. असे म्हणतात की घुबडच्या उजव्या बाजूला पहाणे किंवा बोलणे नेहमीच अशुभ असते, परंतु घुबड डाव्या बाजूस पाहणे चांगले आहे.
 
7. घुबड गच्चीवर बसून आवाज काढत असल्यास एखाद्याची मृत्यूचे संकेत असतं.
 
8. सकाळी पूर्व दिशेकडे घुबड दिसल्यास किंवा आवाज येत असल्यास अचानक धन प्राप्तीचे योग बनतात.
 
9. घुबड एखाद्या आजारी व्यक्तीला स्पर्श करत किंवा त्यावरुन उडत निघाल्यास गंभीर आजार देखील बरे होण्याची शक्यता वाढते.
 
10. एखाद्याच्या दाराजवळ घुबड तीन ‍दिवस रडत असल्यास तेथे चोरी, लूट किंवा आर्थिक हानीची शक्यता अधिक असते.
 
11. जर घुबड एखाद्या घरावर वारंवार येऊन बसत असेल तर विपत्तीचे संकट समजावे.
 
12. पांढरं घुबड दिसणे अत्यंत शुभ मानले गेले आहे.
 
नोट : वरील गोष्टींमध्ये किती सत्य आहे हे आम्हाला ठाऊक नाही. अशा गोष्टी शगुन शास्त्रात आढळतात. घुबडांबद्दल बर्‍याच गोष्टी गोंधळल्या आहेत त्यावर विश्वास ठेवू नका. घुबडांच्या बाबतीत आपण कोणत्याही प्रकारच्या तंत्र विद्येपासून प्रणालीपासून दूर रहावे, ही अंधश्रद्धा आहे आणि यामुळे आपले नुकसान होऊ शकतं.