सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: मंगळवार, 13 ऑगस्ट 2024 (16:25 IST)

या 3 राशींच्या अडचणी वाढतील, शनि नक्षत्र परिवर्तनावर हे 5 उपाय दूर करतील अडथळे

भाऊ-बहिणीतील अतूट विश्वास आणि प्रेमाचा सण 19 ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमेला साजरा होणार आहे. यावेळी या शुभ सणाच्या निमित्ताने सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग आणि धनिष्ठा नक्षत्र यासह अनेक शुभ योगायोग या उत्सवाला विशेष बनवत आहेत. पण दुसरीकडे या सणावर भद्रा आणि पंचक यांची अशुभ सावली तर आहेच, पण त्याआधी रविवार, 18 ऑगस्ट रोजी उलटी फिरणारा शनिही नक्षत्र बदलत आहे. कर्मफलाचा स्वामी आणि न्यायाचा देव शनिदेव या तारखेपूर्वी भाद्रपद नक्षत्राच्या प्रथम स्थानात प्रवेश करत आहे, ज्याचा 3 राशींवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. चला जाणून घेऊया, या 3 राशी कोणत्या आहेत आणि कोणते उपाय करावेत?
 
मिथुन - मिथुन राशीच्या जातकांना सावध राहण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. करिअरमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. व्यवसायासाठीही हा काळ अनुकूल नाही. वडिलोपार्जित संपत्तीच्या वादामुळे अडचणी वाढतील. कायदेशीर अडथळे वाढतील. ऑफिसमध्ये काम पूर्ण करण्यात अडचणी येतील. तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.
 
सिंह - तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य कमी होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना व्यवसायात काही वादांना सामोरे जावे लागू शकते. नफ्याचे प्रमाण कमी होईल. कर्मचाऱ्यांच्या कामाच्या ठिकाणी तांत्रिक समस्या वाढू शकतात. त्यामुळे कामावर परिणाम होईल, अधिकारी नाराज होतील. आर्थिकदृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी प्रतिकूल असू शकतो.
 
तुळ - व्यवसायात वाढ न झाल्याने व्यावसायिकांच्या चिंता वाढतील. राजकारणाशी संबंधित लोकांवर काही मोठे आरोप होऊ शकतात. प्रतिष्ठा कलंकित होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांशी त्रास होऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या संवादात अडथळे येतील. प्रकल्पाचे काम वेळेवर पूर्ण न झाल्यास शिक्षक नाराज राहू शकतात. वाहन जपून चालवा, अपघात होण्याची शक्यता आहे.
 
शनिचे 5 उपाय करा
शनिदेवांना काळ्या आणि निळ्या रंगाच्या वस्तूंची आवड आहे. 17 ऑगस्ट रोजी शनिवार आहे अशात शनि पूजा करुन या रंगाच्या वस्तू देवाला अर्पित कराव्यात.
शनिवारी मोहरीचे तेल, तीळ, उडिद डाळ आणि लोखंड दान करावे. गरीब आणि गरजूंना धन दान करावे याने शनिदेव प्रसन्न होतात.
वक्री शनी आणि साडेसातीच्या प्रभावाने मुक्त होण्यासाठी काळ्या कुत्र्याला मोहरीचे तेल लावलेली पोळी खाऊ घालावी. 
घरातील शेवटली पोळी तेल लावून कुत्र्याला दिल्यानेही शनीचा प्रकोप कमी होतो, अशी प्राचीन मान्यता आहे.
शनीचे अडथळे दूर करण्यासाठी शनिवारी भिकाऱ्यांना खिचडी, भाकरी, भाजीपाला आणि फळे दान केल्यास फायदा होतो, असे मानले जाते.
 
डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती ज्योतिष शास्त्राच्या श्रद्धेवर आधारित असून केवळ माहितीसाठी दिली जात आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही.