शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

पुष्य नक्षत्र: कोणत्या मुहूर्तावर काय खरेदी करावे

पुष्य नक्षत्र बुधवारी सकाळी 3.50 मिनिटापासून सुरु होऊन रात्री 2.33 मिनिटापर्यंत राहील. या दरम्यान दिवाळीपूर्वी खरेदी करण्यासाठी सर्वात शुभ मुहूर्त सकाळी 6.32 ते रात्री 12.08 पर्यंत राहील. अर्थात दिवसभर खरेदी केली जाऊ शकते.
 
ज्योतिषप्रमाणे दिवाळीपूर्वी येणार्‍या पुष्य नक्षत्रात खरेदी केलेल्या वस्तू फलदायी, अनंत काळापर्यंत स्थायी व समृद्धीकारक असतात. या नक्षत्रात खरेदी केलेल्या वस्तू अधिक काळापर्यंत उपयोगी व अक्षय राहतात.
 
हे आहेत पुष्य नक्षत्राचे शुभ मुहूर्त आणि या दरम्यान काय खरेदी करावे जाणून घ्या
 
लाभ
सकाळी 6.32 ते संध्याकाळी 7.56
सोनं, चांदी, तांबा या धातूची भांडी, रत्न, दागिने
 
अमृत
सकाळी 7.57 ते 9.20
इलेक्ट्रिॉनिक सामान, घरासाठी आवश्यक वस्तू
 
शुभ
सकाळी 10.43 ते दुपारी 12.07
चल संपत्ती, वाहन, तांब्याची भांडी, घरगुती वस्तू
 
चर
दुपारी 2.55 ते संध्याकाळी 4.19
वाहन, दागिने, व्यापारी वह्या, कॉम्प्यूटर संबंधी सामान
 
लाभ
संध्याकाळी 4.20 ते 5.43
अचल संपत्ती, दागिने, गुंतवणूक
 
शुभ
संध्याकाळी 7.19 ते रात्री 8.55
सोन्या- चांदीचे दागिने, व्यापारी वह्या
 
अमृत
रात्री 8.56 ते 10.32 पर्यंत
दागिने, वाहन, संपत्ती, कपडे
 
चर
रात्री 10.33 ते 12.08 
कॉम्प्यूटरसंबंधी सामान, घरगुती वस्तू