मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 29 ऑक्टोबर 2018 (12:53 IST)

10 वर्षांनंतर पुष्य नक्षत्र आणि शुभ योगात साजरी होईल अष्टमी

यंदा अष्टमी 31 ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात येणार आहे. या वेळेस अष्टमी पूजा गुरुचे पुष्य नक्षत्र व शुभ योगात साजरी करण्यात येणार आहे आणि चंद्र देखील आपल्या कर्क राशीत राहणार आहे. या दिवशी उपास ठेवल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतील.  
 
अष्टमीच्या पूजेची वेळ संध्याकाळी 5.45 ते 7.02 वाजेपर्यंत राहणार आहे. अष्टमीचा उपास मुलांच्या खुशहाली, दीर्घायू आणि संतानं प्राप्तीसाठी करण्यात येतो. रात्री चांदण्या बघून हा उपास सोडण्यात येतो.  
 
बुध-पुष्य नक्षत्राचा योग खरेदीसाठी शुभ राहणार आहे 
 
दिवाळीच्या आधी 31 ऑक्टोबर रोजी बुध पुष्य नक्षत्रात मालव्य योग आणि चक योग खरेदीसाठी विशेष शुभ राहणार आहे. बुध पुष्य नक्षत्र पहाटे 3.51 वाजेपासून सुरू होऊन रात्री 2.34 वाजेपर्यंत राहणार आहे. 10 वर्षांनंतर दिवाळी आधी बुधवारी हा योग बनत आहे. या अगोदर 2008मध्ये हा योग दिवाळीच्या आधी बनला होता. शास्त्रानुसार वैदिक भाषेत पुष्य नक्षत्राला पुख नक्षत्र देखील म्हणतात. या दिवशी गणेश पूजनाचे विशेष महत्त्व आहे. 27 नक्षत्रांमधून आठवा नक्षत्र पुष्य सर्व नक्षत्रांमध्ये खास मानला जातो. या नक्षत्रात करण्यात आलेली खरेदी चिरस्थायी राहते. पुष्य नक्षत्रात हिर्‍याचे आभूषण, इलेक्ट्रॉनिक, भूमी-भवन, वस्त्र व इतर खरेदी करणे शुभ मानले जाते. या वेळेस किमान 23 तासापर्यंत पुष्य नक्षत्र राहणार आहे.
 
लाभच्या चौघडियात आभूषण, सामान व वाहन खरेदी शुभ 
 
लाभ-अमृतच्या चौघडियात सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत प्रॉपर्टी भूमी संबंधी घेवाण देवाण शुभ राहील.   
 
शुभाचा चौघडिया सकाळी 10.30 ते 1.59 वाजेपर्यंत इलेक्ट्रॉनिक सामान, वाहन, आभूषणाची खरेदी करण्यासाठी उत्तम.   
 
चरचा चौघडिया दुपारी 3 ते 4.30 वाजेपर्यंत वस्त्र, इलेक्ट्रॉनिक खरेदीसाठी उत्तम राहील.   
 
लाभचा चौघडिया संध्याकाळी 4.30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आभूषण, सामान, वाहन खरेदीसाठी शुभ.  
 
शुभ-अमृताचा चौघडिया संध्याकाळी 7 ते रात्री 10.30 वाजेपर्यंत वाहन सोडून इतर सर्व सामान खरेदीसाठी शुभ राहणार आहे.