गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: बुधवार, 1 डिसेंबर 2021 (15:37 IST)

राहु ग्रह शांती, मंत्र व उपाय

वैदिक ज्योतिषानुसार राहू हा क्रूर ग्रह आहे. कुंडलीतील राहू दोषामुळे मानसिक तणाव, आर्थिक नुकसान, समन्वयाचा अभाव कोणत्या ना कोणत्या वेळी प्रत्येक ग्रह अशुभ प्रभाव देऊ लागतो. अशा स्थितीत ग्रहशांतीसाठी उपाय केले जातात. राहू ग्रहाच्या शांतीसाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. यामध्ये राहूशी संबंधित वस्तूंचे दान करणे, रत्ने धारण करणे, राहू यंत्र, राहू मंत्र आणि औषधी वनस्पती हे मुख्य उपाय आहेत. असे मानले जाते की राहूच्या शुभ प्रभावामुळे व्यक्ती रातोरात पदावरून राजा बनते, तर राजापासून रंकापर्यंत अशुभ परिणाम प्राप्त होतात. जर तुमच्या कुंडलीत राहु कमजोर असेल तर राहू ग्रह शांतीसाठी करा हे उपाय. कारण या कामांच्या प्रभावाखाली राहू शुभ फळ देईल आणि तुमचे दुःख कमी होऊ लागतील.
 
पोषाख व जीवन शैली निगडित राहु ग्रह शांतीसाठी उपाय
राहु ग्रह शांतीसाठी उपाय
निळ्या रंगाचे कपडे परिधान करावे.
आपल्या सासरे, आजी-आजोबा आणि रुग्णांचा सन्मान करा.
दारु आणि मास याचे सेवन टाळा.
कुत्र्यांची काळजी घ्या.
 
विशेषतः सकाळी केले जाणारे राहु ग्रहाचे उपाय
दुर्गा देवीची पूजा करावी.
वराह देवाची आराधन करावी.
भैरव देवाची पूजा करावी.
दुर्गा चालीसा पाठ करावा.
 
राहु शांतीसाठी दान करा
राहुच्या अशुभ दशापासून वाचवण्यासाठी राहु ग्रह निगडित वस्तू बुधवारी राहु नक्षत्र (आर्द्र, स्वाती, शतभिषा) मध्ये संध्याकाळी आणि रात्री दान कराव्या.
 
दान केल्या जाणार्‍या वस्तू- जवस, मोहरी, शिक्का, सात प्रकाराचे धान्य (जव, तीळ, तांदूळ, अख्खे मूभ, कांगुनी, चणे, गहू), गोमेद रत्न, निळे किंवा भुरकट रंगाचे कपडे, काचेच्या वस्तू इतर.
 
राहु साठी रत्न
राहुसाठी गोमेद रत्न आहे. हे रत्न धारण केल्याने जातकांना राहु दोषापासून मुक्ती मिळते आणि चांगले परिणाम दिसून येतात.
 
राहु यंत्र
जीवनात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह, वैभव वृद्धी, अचानक येणारे अडथळे आणि आजरांपासून वाचण्यासाठी राहु यंत्र पूजन करावं. राहु यंत्रला बुधवारी राहु नक्षत्रात धारण करावं.
 
राहु ग्रहासाठी जडी
राहु ग्रहाच्या दुष्प्रभावापासून वाचण्यासाठी बुधवारी नागरमोथा मूळ राहु नक्षत्रात धारण करावं.
 
राहुसाठी रुद्राक्ष
राहु दोष निवारण हेतू 8 मुखी रुद्राक्ष धारण करणे फायद्याचे सांगितले गेले आहे.
आठ मुखी रुद्राक्ष धारण करण्यासाठी मंत्र - 
ॐ हूं नमः।
ॐ ह्रां ग्रीं लुं श्री।।
 
राहु मंत्र
राहु महादशा निवारण हेतू बीज मंत्राचं उच्चारण करावं.
मंत्र - ॐ भ्रां भ्रीं भ्रौं सः राहवे नमः!
राहु मंत्राचा 18000 वेळा जाप करावा जेव्हाकी देश-काळ-पात्र पद्धतीनुसार कलयुगात या मंत्राचा जास्तीत जास्त 72000 वेळा जप करावा.
 
आपण हे मंत्र देखील जपू शकता- ॐ रां राहवे नमः!
 
राहू ग्रहाच्या शांतीसाठी उपाय केल्याने जातकांना राहू दोषापासून मुक्ती मिळते. राहू हा छाया ग्रह आहे, ज्याचे कोणतेही भौतिक स्वरूप नाही. हिंदू धर्मग्रंथानुसार, राहू ग्रह भगवान भैरवाचे प्रतिनिधित्व करतो. दुसरीकडे, ज्योतिष शास्त्रानुसार राहू हा पापी ग्रह मानला जातो. याच्या प्रभावामुळे जातकांना अनेक प्रकारच्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो. तथापि, हे मूळ जातकांना शुभ आणि अशुभ दोन्ही परिणाम देते. परंतु त्याचे अशुभ परिणाम टाळण्यासाठी राहू मंत्राचा जप पद्धतीनुसार करावा.
 
ज्योतिषशास्त्रानुसार राहू आणि केतू यांच्यामुळे कुंडलीत काल सर्प दोष निर्माण होतो. हा दोष टाळण्यासाठी राहू शांती उपाय प्रभावी आहेत. राहू यंत्राची स्थापना आणि पूजा केल्याने जातकांना शिक्षण, व्यवसाय आणि करिअरमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात. राहू दोषाचा उपाय छुपे शत्रू, गुप्तपणे येणारे अडथळे, कपट, गुप्त रोग, सामाजिक अनादर आणि भेदभाव यांपासून संरक्षण करतो.