गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

राहू परिवर्तन : 2025 पर्यंत राहूपासून या राशींना राहावे लागेल सतर्क

Rahu ketu Transit 2025 : पूर्ण एक वर्षानंतर राहु ग्रहाने 30 अक्टोंबर 2023 ला दुपारी 02 वाजून 13 मिनिटांनी मेष राशी मधून निघून मीन राशीमध्ये प्रवेश केला होता. जो अजूनही या राशीमध्ये आहे. राहूचे स्पष्ट गोचर 29 नोव्हेंबरला 12:46 झाले होते. 18 मे 2025 ला राहू मीन राशीमधून निघून कुंभ राशीमध्ये प्रवेश करेल म्हणजे 2025 पर्यंत या 12 राशींमध्ये चार राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागणार आहे. 
 

*कर्क, सिंह, वृश्चिक, धनु आणि मीन राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल.
*मेष, वृषभ, मकर आणि कुंभसाठी हे वर्ष चांगले जाणार आहे. 
*इतर राशींसाठी सामान्य वर्ष राहील. 
 
1. मेष राशि Aries: तुमच्या राशीमधून राहू निघून जेव्हा तो मीन राशीमध्ये जाईल तेव्हा गुरु चांडाळ योग्य समाप्त होईल. यामुळे तुमच्या जीवनात सुरु असलेली समस्या संपुष्टात येईल. तसेच गुरुची कृपादृष्टी बरसेल. नोकरीमध्ये प्रमोशन होईल आणि व्यापार जलद गतीने पुढे जाऊन मार्गी लागेल. कर्जातून मुक्ती मिळेल आणि हिक लाभ देखील होईल. अडकलेले कार्य पूर्ण होतील. हा काळ तुम्हाला विशेष उलब्धता करून देईल.
 
2. वृषभ राशि Taurus: वर्ष 2025 पर्यंत राहुचे भ्रमण तुमच्यासाठी खूप शुभ असणार आहे. तुमचे आर्थिक संकट समाप्त होणार आहे. पूर्व दिशेला काही गुंतवणूक केली असेल तर लाभ होईल. धनाची बचत कराल. नोकरीमध्ये प्रमोशन होईल. व्यापाऱ्यांना नफा होईल. सर्व थांबलेले कार्य पूर्ण होतील.  उत्तम आर्थिक लाभ होईल.
 
3. मिथुन राशि Gemini: राहु तुमच्या कार्यस्थळात बदलाचे योग्य बनत आहे. पण तुम्ही मेहनत करत असाल तर याचे फळ शुभ मिळणार आहे. लोक तुमचे कौतुक करतील. पण कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. जे तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. संबंधांना चांगले बनवा. 
 
4. कर्क राशि Cancer : राहू तुमच्या भाग्याला प्रभावित करणार आहे. हा तुमच्यामध्ये धार्मिक भावना जागृत करेल तसेच तीर्थ यात्रा घडू शकते. राहू तुमचे नातेसंबंध आणि आरोग्य बिघडवेल. तसेच तुमची आर्थिक स्थिती देखील बिघडू शकते. याकरिता विशेष ध्यान देणे गरजेचे आहे.  
 
5. सिंह राशि Leo sun sign : राहू तुमचे आरोग्य बिघडवण्यासोबत तुमची आर्थिक परिस्थिती देखील बिघडवेल. वाहन चालवताना तुम्हाला सावधानता बाळगण्याची गरज पडणार आहे. गुंतवणूक करतांना विचारपुर्वक निर्णय घ्या. कोणालाही उधार देऊ नका आणि कोणाच्या बोलण्यात येऊ नका. कार्यक्षेत्रात सतर्क राहावे लागेल. 
 
6. कन्या राशि Virgo: आता पर्यंत चालत आलेले संकटे दूर होतील. पैसे येणायचे मार्ग मोकळे होतील. जीवनात सकारात्मकता वाढेल. कुटुंबात वातावरण चांगले राहील. धन प्राप्त होईल. एखादी आनंदी गोष्ट घडेल. जोडीदाराशी असलेले नाते घट्ट होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. आपत्य आणि व्यापार यांबद्दल निर्णय घेतांना समजुदारीने घ्यावा लागेल. 
 
7. तूळ राशि Libra : राहूचे भ्रमण तुमच्यासाठी चांगले मानले जाणार आहे. नोकरदार वर्गाला चांगला कार्यकाळ आहे. शत्रूवर विजय प्राप्त कराल. कोर्ट-कचेरी प्रकरणात यश मिळेल. व्यापारी वर्गाला वेळ अनुकूल राहील. 
 
8. वृश्चिक राशि Scorpio: राहू परिवर्तनुसार तुमची बुद्धि हुशार होईल. पण चुकीच्या संगतीमुळे नुकसान होऊ शकते. नात्यांसाठी वेळ चांगली आहे. विद्यार्थ्यांना खूप मेहनत करावी लागेल. नाही तर आव्हानांचा सामान राव लागेल. नोकरी, करियर आणि शिक्षण यावर लक्ष देण्याची गरज आहे.  
 
9. धनु राशि sagittarius : राहू तुमच्या कौटुंबिक जीवनात संघर्ष निर्माण करू शकतो. तसेच मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. तसेच कौटुंबिक जीवनात कलह निर्मण करू शकतो. तुम्हाला दूरचा प्रवास करावा लागू शकतो. तसेच आरोग्याबद्दल सतर्क राहावे. 
 
10. मकर राशि Capricorn: जर तुम्ही नोकरदार वर्ग असला किंवा व्यापारी वर्ग असाल तर आर्थिक वृद्धी होईल. आर्थिकरित्या मजबूत व्हाल. शनीची वक्रदृष्टी दूर होईल. पहिल्यापासून चालत आलेली समस्या दूर होईल. तसेच तुमचे थांबलेले कार्य पूर्ण होतील. पराक्रम वाढेल. 
 
11. कुंभ राशि Aquarius : राहू परिवर्तनामुळे तुमच्या आहाराबद्दलच्या समस्या निर्माण होतील. धन कमवण्याच्या लालचपोटी एखादे पाऊल वाईट पडू शकते. जे उभे जाऊन नुकसानदायक ठरू शकते. कौटुंबिक जीवनात समस्या आणि संघर्ष निर्माण होऊ शकतात. याकरिता सयंम ठेवावा लागेल. कार्यक्षेत्रात वेळ अनुकूल राहील.
 
12. मीन राशि  Pisces: आता तुम्हाला भावनाप्रधान न राहता व्यावहारिक बनावे लागेल. तुमच्यामध्ये आत्मविश्वास एवढा वाढू शकतो की जो तुम्हाला निष्कलंक देखील बनवू शकतो. कोणाचीही काळजी न घेतल्यास नुकसान झेलावे लागू शकते. या स्थितीपासून सुरक्षित राहाल तर राहूचे परिवर्तन तुम्हाला चांगले ठरू शकते. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 
 
Edited By- Dhanashri Naik