शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 जून 2020 (07:18 IST)

अमावस्या आणि पौर्णिमेच्या जवळच्या का वाढतात आत्महत्या किंवा अपघात, जाणून घ्या गुपित

reason behind accidental cases near amavasya and prunima
वर्षांमधील असे बरेच दिवस आणि रात्र येतात जे पृथ्वी आणि माणसाच्या मनावर सखोल प्रभाव टाकतात. त्यामधून देखील महिन्यातील 2 दिवस सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत - पौर्णिमा आणि अमावस्या.
 
नकारात्मक आणि सकारात्मक शक्ती : 
पृथ्वीच्या मुळात 2 प्रकाराच्या शक्ती असतात. सकारात्मक आणि नकारात्मक, दिवस आणि रात्र, चांगले आणि वाईट. पृथ्वीवर दोन्ही शक्ती आप आपले वर्चस्व गाजवतात. काही अश्या मिश्रित शक्ती देखील असतात, जसे की संध्याकाळ होते जे दिवस आणि रात्रीच्या मध्ये असते. या मध्ये दिवसाचे गुण देखील असतात आणि रात्रीचे गुण देखील असतात. अश्या प्रकारे पौर्णिमेच्या दिवशी सकारात्मक शक्ती आणि अवसेच्या दिवशी नकारात्मक शक्ती जास्त करून सक्रिय राहतात. 
 
पौर्णिमेचं विज्ञान : 
1 पौर्णिमेच्या रात्री मन अस्वस्थ राहतं आणि झोप देखील कमी येते. दुर्बळ मनाचे लोकांमध्ये आत्महत्या किंवा खून करण्याचे विचार वाढतात. शास्त्रज्ञांच्या मते या दिवशी चंद्राचा प्रभाव तीव्र असतो या कारणामुळे शरीरात रक्तामधील न्यूरॉन पेशी सक्रिय होतात आणि अश्या स्थितीत व्यक्ती अत्यधिक उत्तेजित आणि भावनिक असतो. एकदाच नाही, जर प्रत्येक पौर्णिमेला असे घडले तर व्यक्तीचे भविष्य देखील त्यानुसार बनतं आणि बिघडतं.
 
2 ज्यांना अपचनाचा आजार असतो किंवा ज्यांचा पोटात चय-उपचय क्रिया शिथिल होते, तेव्हा असे ऐकण्यात येते की अश्या माणसांना जेवल्यावर नशा केल्याची अनुभूती होते. आणि अशावेळी त्यांचे न्यूरान्स पेशी शिथिल होतात जेणे करून मेंदूचा ताबा शरीरापेक्षा मनावर जास्त होतो. अश्या माणसांवर चंद्राचा प्रभाव चुकीची दिशा घेतो. या कारणासाठी पौर्णिमेचा उपवास धरण्याचा सल्ला दिला जातो.
 
3 चंद्र पृथ्वीच्या पाण्याशी निगडित आहे. पौर्णिमेचा काळात समुद्रात भरती येते कारण चंद्र हा समुद्राच्या पाण्याला वर ओढतो. मानवाच्या शरीरामध्ये सुमारे 85 टक्के पाणी असतं. पौर्णिमेच्या दिवशी या पाण्याचा वेग आणि गुणधर्ण बदलतात. 
 
चेतावणी :
या दिवशी कोणत्याही प्रकाराचे तामसिक आहाराचे सेवन करू नये. 
मद्यपानापासून लांबच राहावे. जेणे करून ते आपल्या शरीरावरच नव्हे तर भविष्यावर देखील विपरीत प्रभाव पाडू शकतं. 
जाणकार लोकं म्हणतात की चतुर्दशी, पौर्णिमा आणि प्रतिपदा या 3 दिवसांमध्ये पावित्र्य जपणं चांगलं आहे. 
 
अवसेचं विज्ञान : 
1 अवसेच्या दिवशी भुतं- प्रेतं, पितर निशाचर प्राणी आणि राक्षस अत्यधिक क्रियाशील आणि मुक्त असतात. अश्या दिवसाचे स्वरूप बघूनच सावधगिरी बाळगली पाहिजे. 
 
2 ज्योतिष शास्त्रामध्ये चंद्राला मनाचे देव मानले गेले आहे. अवसेला चंद्र दृष्टीस येत नाही. अश्या वेळेस जे लोकं जास्त भावनिक असतात त्यांचा मनांवर याचा जास्त प्रभाव पडतो. मुली खूपच भावनिक असतात. या दिवशी चंद्र दिसत नसल्याने शरीरातील हालचाल वाढते. जे माणसं नकारात्मक विचारसरणीचे असतात त्यांच्यावर नकारात्मक शक्ती आपला प्रभाव जास्त पाडते. 
 
चेतावणी :
या दिवशी कोणत्याही प्रकाराचे तामसिक आहाराचे सेवन करू नये. 
मद्यपानापासून लांबच राहावे. जेणे करून ते आपल्या शरीरावरच नव्हे तर भविष्यावर देखील विपरीत प्रभाव पाडू शकतं. जाणकार लोकं म्हणतात की चतुर्दशी, अमावस्या आणि प्रतिपदा या 3 दिवसांमध्ये पावित्र्य जपणं चांगलं आहे.