मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: रविवार, 21 जून 2020 (05:18 IST)

भविष्याचे संकेत देतं ग्रहण, जाणून घ्या पुढील वेळ कशी असणार

अथर्व वेदामध्ये सूर्यग्रहण आणि चंद्र ग्रहणाला अशुभ आणि दूर्देवीय म्हटले आहे. म्हणून राहूने ग्रसित सूर्याच्या शांततेसाठी प्रार्थना केली गेली आहे. येथे सूर्य आणि चंद्रग्रहणातून होणाऱ्या शुभ आणि अशुभ शकुनांबद्दलची माहिती जाणून घेउया.....
 
1 पाऊस पडल्यानंतर इंद्रधनुष्य येणे हे शुभ असण्याची माहिती देतं.
 
2 सकाळच्या वेळी सूर्य न दिसणे हे अशुभ मानले गेले आहे.
 
3 प्रवासाच्या वेळी वारं थांबून थांबून वाहणे अशुभ मानले गेले आहे. 
 
4 सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहणे आळवसणे, अशुभतेचे सूचक आहे. 
 
5  सूर्याच्या आकाराचे धनुष्याकार किंवा कमानीरूपात दिसणे अशुभ असतं.
 
6 घाणेरड्या पाण्यात किंवा पदार्थांमध्ये सूर्याचे प्रतिबिंब दिसल्यास ते अशुभ असतं
 
7 एखाद्या पवित्र स्थळी अंघोळ आणि जाप केल्याने सूर्य आणि चंद्र ग्रहणाच्या दोषांपासून मुक्ती मिळते.
 
8 सूर्य आणि चंद्रग्रहणानिमित्त पवित्र तलावमध्ये अंघोळ करण्याचे महत्व सांगितले आहे. 
 
9 सूर्याचे चंद्रासारखे दिसणे अशुभ आणि मृत्यूचे सूचक मानले जाते.