शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

रत्न धारण करण्यापूर्वी हे नक्की वाचा

रत्न आपल्या जीवनातील समस्या सोडवू शकतात परंतू त्यांचे शुद्ध होणे अनिवार्य आहे. सोबतच रत्न धारण करण्यासाठी निर्धारित नियमांकडे दुर्लक्ष करून चालता येत नाही.
 
नऊ ग्रहांमध्ये एखादा ग्रह कमजोर झाल्यास ज्योतिषी अनेकदा रत्न धारण करण्याचा सल्ला देतात परंतू योग्य रित्या धारण केल्यास याचा प्रभाव कळून येतो. रत्नांचे आपल्या जीवनावर कसा प्रकारे प्रभाव पडतो हे रत्न कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी धारण केले गेले आहे यावर अवलंबून असतं.
 
रत्नांमध्ये मुख्यतः नऊ रत्न घातले जातात, यात सूर्यासाठी माणिक, चंद्रासाठी मोती, मंगल- कोरल, बुध- पन्ना, गुरु- पुखराज, शुक्र- हिरा, शनी- नीलम, राहू- गोमेद आणि केतूसाठी लहसुनिया.
 
या दिवशी धारण करावं रत्न
 
रत्न धारण करण्यापूर्वी बघून घ्या की 4, 9 आणि 14 तिथी तर नाही. या तारखांवर रत्न धारण करू नये. या व्यतिरिक्त रत्न धारण करत असलेल्या दिवशी गोचरचा चंद्र आपल्या राशीच्या 4,8,12 यात नसावा. अमावस्या, ग्रहण आणि संक्रांतीच्या दिवशी रत्न धारण करून नये.
 
कोणत्या धातूमध्ये रत्न धारण करावे
 
काही रत्न सोनं किंवा चांदीमध्ये धारण करावे, जेव्हाकि मोती किंवा रत्नाचे उपरत्न चांदीमध्ये धारण करावे. या व्यतिरिक्त रत्नाचं वजन महत्त्वाचे आहे. धारण केलेल्या रत्नाचे वजन योग्य नसल्यास प्रभाव दिसून येणार नाही. डायमंड सोडून इतर सर्व रत्न किमान तीन रत्तीचे असावे. ज्याने त्याचा पूर्ण लाभ मिळण्याची शक्यता असते.