सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019 (10:34 IST)

गार्नेट (गोमेद) केव्हा धारण करावा

गार्नेट हा सूर्याचा उपग्रह मानला गेला आहे. या रत्नाला माणकाच्या जागेवर घालू शकता. हा रत्न याकुब व रक्तमणी नावाने सुद्धा ओळखला जातो. हे रत्न लाल रंगाचा असून भरीव असते. हा स्वस्त असल्यामुळे सर्व ठिकाणी उपलब्ध असतो.   
 
या रत्नाला शुक्ल पक्षेतील रविवारी सकाळी 10.15 मिनिटांने तांब्यात गाठून अनामिकेत धारण केले पाहिजे. या रत्नाला धारण केल्याने सौभाग्यात वाढ, स्वास्थ्यात लाभ, मान-सन्मानाची प्राप्ती होते. यात्रेत फलदायी ठरतो. मानसिक ताण तणाव दूर होतात. मनातील शंका कुशंकेला दूर पळतात. 
 
लाल रंगाचा गार्नेट आजारपणात फायदेशीर ठरतो तर पिवळ्या रंगाचा गार्नेट कावीळ या आजारपणात लाभदायक आहे. याला धारण केल्याने वीज पडली तरी त्याचा परिणाम होत नाही. यात्रेत कुठलीही हानी होत नाही, अशी समजूत आहे.