testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आपण अर्पण केलेला नैवेद्य देव ग्रहण करतात का ?

Last Modified सोमवार, 4 फेब्रुवारी 2019 (10:42 IST)
एका शिष्याने आपल्या गुरुंना विचारले, "खरंच देव आपण दाखविलेला नैवेद्य ग्रहण करतात का ? जर देव तो ग्रहण करतात, तर ते पदार्थ नाहीसे का होत नाहीत ? "त्यावेळी गुरुंनी त्या शिष्याला काहीच ऊत्तर दिले नाही. आपला नियमित पाठ शिकवित राहिले. त्या दिवशीच्या पाठामध्ये गुरुंनी आपल्या शिष्यांना एक श्लोक शिकविला. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते। पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते।। पाठ संपल्यावर गुरूंनी सर्व शिष्यांना पुस्तकात पाहून हा श्लोक कंठस्थ करण्यास सांगितले. काही वेळानंतर गुरूंनी प्रश्न विचारणाऱ्या शिष्याजवळ जाऊन त्याला विचारले, "काय, श्लोक तोंडपाठ झाला की नाही ? "त्यावर त्या शिष्याने गुरूंना तो श्लोक अचूक म्हणून दाखविला. तरी देखील गुरूंनी नकारार्थी मान हलविली. त्यावर शिष्य आर्जवाने म्हणाला, "तुम्हाला हवं असेल तर पुस्तकात बघा आर्य, मी श्लोक बरोबर म्हंटलाय ! " त्यावर गुरू म्हणाले, "अरे, श्लोक तर पुस्तकातच आहे, मग तू कसा काय कंठस्थ केलास ? "त्यावर शिष्य काहीच बोलू शकला नाही. त्यावेळी गुरूंनी त्याला समजाविले की, "सध्या पुस्तकात जो श्लोक आहे, तो स्थूल स्थितीत आहे, आणि तू जो श्लोक कंठस्थ केलास तो सूक्ष्म स्थितीत तुझ्या अंतरंगात प्रविष्ट झाला. तुझे मनही त्याच स्थितीत असते. तू श्लोक कंठस्थ केलास त्यावेळी पुस्तकातील जे त्याचे स्थूल रुप आहे, त्याचा काहीच ह्रास झाला नाही." "त्याचप्रकारे संपूर्ण विश्वात व्याप्त असलेला परिपूर्ण परमात्मा जेंव्हा आपण अर्पण केलेल्या नैवेद्याचे सूक्ष्म स्थितीत ग्रहण करतो, तेंव्हा त्याच्या स्थूल रुपात काहीच ह्रास होत नाही. नैवेद्याचे ते स्थूल रुपच आपण नंतर प्रसाद म्हणून स्विकारतो."


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

धनत्रयोदशीची कहाणी

धनत्रयोदशीची कहाणी
एकदा यमराजाने आपल्या दूतांना विचारलं, "तुम्ही प्राण्यांचे प्राण हरण करता त्या वेळी ...

शुभ पुष्य नक्षत्रावर काय करणे योग्य ठरेल, नक्की जाणून घ्या

शुभ पुष्य नक्षत्रावर काय करणे योग्य ठरेल, नक्की जाणून घ्या
पुष्य नक्षत्राचा स्वामी शनी आहे म्हणून या दिवशी शनी व्रत आणि पूजन केलं जातं.

पुष्य नक्षत्रात वाहनाची खरेदी करावी की नाही ?

पुष्य नक्षत्रात वाहनाची खरेदी करावी की नाही ?
पुष्य नट्रक्षात लोक बर्‍याचदा सोनं किंवा चांदी विकत घेतात, पण लोखंड खरेदी करायचा की नाही ...

यंदा दोन दिवस पुष्‍य नक्षत्र, जाणून घ्या कोणत्या दिवशी काय ...

यंदा दोन दिवस पुष्‍य नक्षत्र, जाणून घ्या कोणत्या दिवशी काय खरेदी करावी
ज्योतिष्यांप्रमाणे यंदा पुष्‍य नक्षत्र दोन दिवस असेल. 21 ऑक्टोबर रोजी सोम पुष्य आणि 22 ...

दिवाळीपूर्वी ही कामे नक्कीच करायला हवी, लक्षात नसेल तर एकदा ...

दिवाळीपूर्वी ही कामे नक्कीच करायला हवी, लक्षात नसेल तर एकदा वाचून घ्या
काचेचं तुटलेलं सामान घरातील कोणत्याही कोपर्‍यात तुटलेलं काचेचं सामान किंवा खिडकीत तुटका ...

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...