शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शनिवार, 5 जानेवारी 2019 (11:16 IST)

शनिश्चरी अमावस्या : शनिच्या उपसनासाठी सोपे उपाय

शनिवार 5 जानेवारी 2019, शनिश्चरी अमावस्या आहे. धार्मिक मान्यतेनुसार शनिश्चरी अमावास्येला शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी दान-धर्म आणि विशेष उपाय केले जातात. ज्या लोकांना शनीची साडेसाती, अडीचकी, महादशा सुरु असेल त्यांनी शनिश्चरी अमावास्येच्या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी विशेष उपाय अवश्य करावेत. 
 
मनुष्याच्या चांगल्या-वाईट कर्माचे फळ शनिदेव त्याला देतात. येथे जाणून घ्या, शनिदेवाला प्रसन्न करण्याचे काही खास आणि अचूक उपाय....
 
1. शनिवारी शनि यंत्राची घरामध्ये स्थापना करून पूजा करा. त्यानंतर दररोज नियमितपणे या यंत्राची पूजा केल्यास शनिदेव प्रसन्न होतात. 
 
दररोज या यंत्रासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. निळे किंवा काळे फुल अर्पण केल्यास लाभ होईल.
 
2. शमी झाडाचे मूळ विधीपूर्वक घरी घेऊन या. शनिवारी श्रवण नक्षत्रमध्ये एखाद्या योग्य विद्वानाकडून अभिमंत्रित करून हे मूळ काळ्या 
 
धाग्यात बांधून डाव्या गळ्यात किंवा हातावर धारण करा. या उपायाने शनिदेव प्रसन्न होतील आणि सर्व अडचणी दूर करतील.
 
3. उपासात दिवसा दूध, लस्सी व फळांचे ज्यूस ग्रहण केले पाहिजे.