Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Shani Dasha आणि उपाय

Updated: शनिवार, 3 नोव्हेंबर 2018 (09:34 IST)
शनी ज्या भावाने राशीत विराजमान असतो, त्या भावाने तिसर्‍या, सातव्या आणि दहाव्या स्थानावर प्रभाव टाकतो. शनी ज्या राशीत भ्रमण करतो त्याच्या पुढच्या किंवा मागच्या राशीत साडेसातीच्या रुपाने प्रभाव टाकतो. शनी अशुभ असल्यास वात, कफ, विकलांगता, मानसिक विकार, पोलिओ, कर्करोग, हार्निया आदी रोगांना कारक ठरतो. वधूवरांपैकी एकाची कुंडली मंगळाची असल्यास शनीच्या सहाय्याने मंगळ दोषांचे निवारण केले जाऊ शकते.

सार्वजनिक जीवनात शनीला लोकशाही परंपरेचा प्रतिनिधी समजले गेले आहे. यामुळे राजकारणात यश किंवा अपयशासाठी शनी ग्रहाला महत्व आहे. शनीमुळेच वय, मृत्यू, चोरी, नुकसान, खटला, कैद, शत्रू याबाबत माहिती मिळू शकते.

मेष लग्नात शनी सातव्या, दहाव्या आणि अकराव्या स्‍थानावर शुभ असतो. परंतु, प्रथम भावात अत्यंत अशुभ असतो. शनीच्या अशुभ फळापासून वाचण्यासाठी खालील उपाय करु शकता. ‍

तीळ किंवा दुसर्‍या कोणत्याही तेलाने मॉलिश करून काळे तीळ, बडीशोप यांना पाण्यात मिसळून आंघोळ करावी. त्यामुळे अनिष्ट प्रभावापासून शांती मिळते. लोखंड, काळे कपडे, बडीशोप, काळे तीळ, चामडे, ‍‍‍‍निळे फुल यांचे दान करावे. शनीच्या कोपापासून वाचण्यासाठी शनी मंत्राचा जप करावा.
WD WD

ॐ शं शनैश्वराय नम: किंवा शनीच्या अन्य मंत्राचाही जप करू शकता. शनी यंत्राचेही यथासंभव दान करावे.शनी ग्रहाच्या पूर्ण शांतीसाठी पूजा-पाठ केल्यानंतर अशुभ प्रभाव शुभ प्रभावात रुपांतरीत हतोते. यासाठी हवनसुध्दा केले पाहिजे. तसेच शनिवारचे व्रतही करावे. शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळील हनुमान मंदिर किंवा शिव मंदिरात जावून दिवा लावावा.

 
शनी ग्रह काळ्या रंगाच्या पशु-पक्ष्यांचे प्रतिनिधीत्व करीत असल्यामुळे त्यांची सेवा करावी. त्यांना सुखमय भोजन द्यावे. व्यसनांपासून दूर राहावे. छळ, कपट, खोटी साक्ष यापासून लांब रहावे. सामसुम असलेल्या किंवा निर्जन ठिकाणी जाणे टाळावे. तसेच अंधारापासून लांब रहावे. वडिलधार्‍या व्यक्तींचा मान ठेवावा. शनी अशुभ असल्यास शनीच्या वस्तुंचे दान करावे. शनी शुभ असल्यास शनीचे वस्तूंचे दान करू नये.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

Deep Amavasya 2026 Wishes in Marathi दीप अमावस्येच्या शुभेच्छा

श्रावण सोमवारला कोणती फुले भगवान शिवांना अर्पण करू नयेत?

Mangalagaur Marathi Ukhane 2026 मंगळागौर पूजा मराठी उखाणे

लग्नानंतर पहिली मंगळागौर का साजरी करतात? जाणून घ्या परंपरेमागचे धार्मिक कारण

Jivati Puja 2026 Wishes in Marathi श्रावण शुक्रवार विशेष जरा जिवंतिका पूजनाच्या शुभेच्छा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments