1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Updated : मंगळवार, 19 मे 2020 (16:38 IST)

शनी जयंती 2020 : शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी काही ज्योतिषी उपाय

Shani Jayanti 2020
सूर्यपुत्र शनी देवांची जयंती दरवर्षी वैशाख महिन्यातील अमावस्याला साजरी केली जाते. यंदाची शनी जयंती 22 मे रोजी आहे. अशी मान्यता आहे की साडेसाती, ढैय्या, आणि महादशा या सारख्या शनी दोषातून सुटका मिळविण्यासाठी शनी जयंतीला शनी देवाची पूजा करावी ज्याने दुष्प्रभाव कमी होतो. अमावास्येला शनी देवाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. शनी अमावास्येला शनी देवाची उपासना करणे फायदेशीर असतं. 
 
शनी पूजेचं महत्त्व : 
शनी पूजनाला विशेष महत्त्व आहे. आजारपण, पैशांची कमतरता, कामामध्ये व्यत्यय येत असल्यास आवर्जून शनी देवाची पूजा केली पाहिजे. शनी देव न्यायाचे देव आहेत. ते आपल्यावर प्रसन्न झाल्यावर आपले सर्व त्रास, व्याधी दूर होतात. ज्योतिष शास्त्रात शनीचे विशेष महत्त्व आहेत. शनी आपल्या कुंडली (पत्रिकेत) शुभ स्थानी असल्यावर आपल्याला रंकापासून राजा देखील बनवू शकतो.
 
शनी देवांना प्रसन्न करण्याचे काही उपाय : 
शनी जयंतीला शनी देवाची उपासना केल्याने बरेच फायदे होतात. 
* शनी जयंतीला शनी देवांना प्रसन्न करण्यासाठी तिळाचे आणि मोहरीचे तेल ‍अर्पित करावे.
* काळी डाळ, काळ्या रंगाचे कपडे आणि लोखण्डी वस्तूंचे दान केल्याने शनीचा आशीर्वाद मिळतो.
* शनी जयंतीला दान देणे शुभ असतं.
* देऊळात जाऊन शनी देवांसह मारुतीचे दर्शन केल्याने शुभ फळ मिळतात. 
 
काय करावं आणि काय नाही :
* काळे तीळ आणि काळ्या उडदापासून बनवलेले खाद्य पदार्थ वाटावे. 
* शनी देवांच्या मूर्तीला तेल अर्पण करावे. शनिवारी खिचडी खावी.
* शनी देवांची पूजा करताना निळे फुल अर्पित करावे. शनिवारी लाल रंगाचे कपडे घालू नये.
* शनी देवासमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.
* शनिवारी मास खाऊ नये, मद्यपान करू नये. तसेच कांदा आणि लसूण खाऊ नये.
* शनिवारी अन्नात तेलाचा वापर करू नये.