रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 18 मे 2020 (13:45 IST)

आपणास ठाऊक आहे का शनी देवांची 16 वैशिष्ट्ये

1 सूर्यपुत्र शनिदेव मृत्युलोकाचे असे अधिपती स्वामी आहेत जे वेळ आल्यावर माणसाला ज्याचा त्याचा चांगल्या किंवा वाईट कर्मांच्या आधारांवर दंड देऊन सुधारण्यासाठी प्रवृत्त करतात.
2 शनी हे आधुनिक काळातील न्यायाधीश आहेत आणि न्याय नेहमी न आवडणारा असतो म्हणूनच तो क्रूर मानला जातो.
3 शनिदेवाचा मूळ रंग काळा आहे ज्यावर अजून कोणता रंग चढतच नाही.
4 शनीचे धातू लोखण्डी आहेत जे सर्वात योग्य आणि शक्तिशाली आहे.
5 शनीच्या आवडणाऱ्या वस्तू तेल, कोळसा, लोखंड, काळे तीळ, उडीद, जोडे- चपला देणगी म्हणून दिल्या जातात.
6 शनीदेवांच्या स्थापनेत वेळ आणि श्रमांचे आंशिक दान हे सर्वश्रेष्ठ दान मानले गेले आहे.
7 शनिदेव हे अध्यात्माचे गुरु आहे कोणत्याही पूजा, उपासनेसाठी त्याचे फळ मिळविण्यासाठी शनी महाराजांची उपासना, पूजा करणे आवश्यक आहे. 
8 श्री शनिदेव संस्थेचे स्वामी आहेत, त्यांचा कृपेशिवाय संयुक्त कुटुंबाची कल्पना करणे अशक्य आहे.
9 शनिदेव सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आध्यात्मिक, प्रशासकीय, शिक्षण, व्यवसाय इत्यादीमध्ये उंची देण्याचे काम करतात.
10 शनिदेव रोगमुक्ती आणि आयुष्य वृद्धीची इच्छा पूर्ण करतात.
11 शनिदेव आजच्या युगातील कलियुगातील देव आहे.
12 शनिदेवांचे शस्त्र - धनुष्य, बाण आणि त्रिशूळ आहेत.
13 शनिदेवांपासून राजा ते रंकापर्यंत सर्वेच घाबरलेले आणि प्रभावित आहे.
14 शनिदेव हे नश्वर जगतातील एक शाश्वत आणि असामान्य देव आहे.
15 शनिदेवांचे वाहन गिधाड आणि रथ लोखंडाचे बनलेले आहेत.(मत्स्यपुराण 127.8)
16 शनिदेवांचे अनेक नावे आहेत, त्यांचे कार्य क्षेत्र मोठं आणि पसरलेले आहे.