यश मिळवण्यासाठी दूर करा आपल्या स्वभावातील ही कमतरता
प्रत्येकाच्या स्वभावात काही न काही कमी आणि खुबी असते. परंतू स्वभावात असलेल्या कमीपणामुळे अनेकदा मनुष्य प्रगती करू पात नाही. अनेकदा लोकांना आपल्या स्वभावातील कमी जाणवत नाही म्हणजे त्यांना हेच कळतं नाही की आपलं नक्की कुठे चुकतंय.. तर राशीनुसार आज आपण जाणून घ्या आपल्या स्वभावात काय कमी आहे ते.... आणि त्या हिशोबाने आपण कमी दूर करून पुढे वाढला तर नक्की यश मिळेल...
मेष
मेष राशीच्या लोकांना खूप लवकर राग येतो. यामुळे इतर लोकांशी यांचे संबंध बिघडतात. परिणामस्वरूप यशाचे दार बंद होतात. तर आपल्याला रागावर नियंत्रण करायला शिकणे फार गरजेचं आहे.
वृषभ
वृषभ राशीचे लोकं जिद्दी स्वभावाचे असतात. आपल्या मनमर्जीने चालणार्या या लोकांशी इतर लोकं लवकरच नाराज होतात. यांचा हाच दुर्बलपणा यांना पुढे वाढण्यापासून रोखतं.
मिथुन
मिथुन राशीचे लोकं दुसर्यांवर लवकर विश्वास टाकतात. स्वत:ची बुद्धी वापरत नाही यामुळे नुकसान झेलावं लागतं. यामुळे प्रगती होत नाही.
कर्क
कर्क राशीचे लोकं अत्यंत भावुक असतात. व्यावहारिक नसल्यामुळे यांना कामात यश मिळतं नाही. म्हणून या लोकांना कुठे भावुक व्हायचं आणि कुठे व्यावहारिक हे माहीत असावा.
सिंह
सिंह राशीचे लोकं आपल्या गरजा पूर्ण करण्यात कुठलीही कमी राहू देत नाही. खूप खर्च करतात आणि शॉटकर्ट मारण्यातही मागे-पुढे बघत नाही. या स्वभावामुळे भविष्यात पश्चात्ताप होतो म्हणून आटोक्यात राहण्याचा प्रयत्न करावा.
कन्या
स्वभावाने गर्विष्ठ असल्यामुळे दुसर्यांना कमी समजणारे असे असतात कन्या राशीचे जातक. यांचा हा स्वभाव हावी असल्यामुळे प्रगती थांबते. दुसर्यांना महत्त्व देण्याने काही बिघडतं नाही हे लक्षात घ्यावे.
तूळ
तूळ राशीचे जातक दुसर्यांची मदत करण्याबाबत विचार करतात आणि यांच्या या सरळ स्वभावामुळे दुसरे यांचा फायदा घेतात. मदत करणे चुकीचे नाही परंतू याचा दुसरे गैरफायदा तर घेत नाही याची काळजी घ्यावी.
वृश्चिक
लहान-सहान गोष्टींवर ज्वालामुखी प्रमाणे भडकणे हा वृश्चिक राशीच्या जातकांचा मूळ स्वभाव. राग बुद्धीवर हावी होतो आणि बनत असलेले कामं बिघडतात. राग प्रगतीत अडथळे निर्माण करतं.. म्हणून रागावर नियंत्रण असावे.
धनू
धनू राशीचे जातक अधिक बोलणारे असतात. यांचा गोष्टी-किस्से संपता संपत नाही. यांची अशी वागणूक भारी पडते आणि प्रगती थांबते.
मकर
मकर राशीच्या जातकांना वाटतं की त्यांच्यात कुठलीही कमी नाही आणि यामुळे ते नवीन शिकायला तयार नसतात. आणि त्यांची ही सवय प्रगतीत अडथळे निर्माण करते.