शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

नोकरीत यश मिळवण्यासाठी सोपे उपाय, नक्की प्रमोशन मिळेल

* नोकरीत यश किंवा प्रमोशनसाठी 43 दिवस दररोज पाण्यात रोली आणि लाल फुल घालून सूर्याला अर्घ्य द्यावे.
 
* दान-पुण्य कधीच वाया जात नसतं. रविवारी बेसनाचे लाडू, चण्याची डाळ आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र दान करावे.
 
* प्रमोशनचे लक्षण दिसत असल्यास 43 दिवस मंदिरात जाऊन तीन केळी अर्पित कराव्या. किंवा आपण केळी एखाद्या गरिबाला खायला देखील देऊ शकता.
 
* गुरु ग्रहाला सुख-समृद्धी, धन आणि प्रगतीचे कारक मानले गेले आहे. म्हणून आपण हळद किंवा केशराने तिलक केल्यास फायदा मिळेल.
 
* आपली स्थिती उत्तम ठेवण्यासाठी आपण आपल्या जन्म महिना अर्थात ज्या महिन्यात आपला जन्म झाला असेल त्या महिन्यातील गुरुवारी गायीला गोड पोळी किंवा केळी खाऊ घालाव्या.
 
* आपले अधिकारी खूश असतील तर सर्व काम सुरळीत पार पडतात. अशात आपल्या उच्च अधिकार्‍यांना रविवारी खीर खाऊ घातल्याने सकारात्मक प्रभाव दिसून येईल.
 
* नकारात्मकता दूर केल्याने अनेक काम आपोआप घडू लागतात. नोकरीत प्रगतीसाठी माणिक्य रत्न धारण करता येईल परंतू आपल्या कुंडलीचा अभ्यास केल्यावर ज्योतिष सल्ला घेतल्याशिवाय धारण करणे योग्य ठरणार नाही.
 
* आपण 43 दिवस बडी शेप दान केल्याने देखील बदल जाणवेल.
 
* नोकरीत अडचणी येत असल्यास शनिवारी एखाद्या सुनसान जागेवर जाऊन जमिनीत काजळ दाबावे.