गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 6 मार्च 2019 (08:58 IST)

'ब्रह्मास्त्र'च्या लोगोचे हटके प्रमोशन

दिग्दर्शन आयान मुखर्जी यांनी 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाच्या लोगोचं हटके पद्धतीने प्रमोशन केले आहे. यात आयान मुखर्जी यांनी त्यांच्या ब्रह्मास्त्रच प्रमोशन थेट प्रयागराज येथे सुरु असलेल्या कुंभमेळ्यात केलं. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम हजर होती. 
 
चित्रपटाचा लोगो भन्नाट पद्धतीने प्रदर्शित व्हावा यासाठी त्यांनी कुंभमेळ्याचा आधार घेतल्याचं दिसून आलं. कुंभमेळ्यात जमलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत आणि १५० ड्रोनच्या साहाय्याने आकाशात ‘ब्रह्मास्त्र’चा लोगो प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे यावेळी आलिया आणि रणबीरच्या चित्रपटातील भूमिकांची नावंही जाहीर करण्यात आली. त्यानुसार आलियाचं नाव इशा आणि रणबीरचं नाव शिवा असं असणार आहे.