गुरूवार, 10 ऑक्टोबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

Sunday Upay यश मिळवण्यासाठी आणि प्रगतीसाठी रविवारी हे काम करा

रविवार हा सूर्यदेवाला समर्पित आहे. सूर्यदेव ही अशी देवता आहे जिची प्रत्यक्ष रूपात पूजा केली जाते. त्याची उपासना केल्याने दीर्घायुष्य, रूप, आरोग्य आणि ऐश्वर्य प्राप्त होते. सूर्यदेवाचे व्रत केल्याने शरीर निरोगी होते, तसेच अशुभ परिणामही शुभ परिणामात बदलतात. रविवारी सूर्यदेवाची विधिपूर्वक पूजा केल्याने कार्यक्षेत्रात प्रगती, सुख-समृद्धी, धैर्य आणि शत्रूंवर विजय प्राप्त होतो.
 
सकाळी सूर्यदेवाची पूजा केली जाते. सूर्योदयाच्या आधी सूर्योपासनेसाठी उठावे. स्नान केल्याशिवाय सूर्यदेवाला जल अर्पण करू नये.
तांब्याच्या भांड्यात तांदूळ, लाल रंगाची फुले ठेवून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे.
सूर्यदेवाला जल अर्पण करताना लक्षात ठेवा की तांब्याच्या कलश व्यतिरिक्त इतर कोणत्याही धातूचा कलश किंवा भांडे वापरू नका.
सूर्यदेवाला जल अर्पण करताना ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा.
या दिवशी तांब्याची भांडी, लाल वस्त्र, गहू, गूळ आणि लाल चंदन दान करणे शुभ मानले जाते.
रविवारी सकाळी घरातून बाहेर पडण्यापूर्वी घरातील सर्व सदस्यांनी कपाळावर चंदनाचा टिळक लावावा.
रविवारी पिठाचा गोळा बनवून माशांना खाऊ घाला. सकाळी गायीला भाकरी द्यावी.
रविवारी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे.
रविवारी एखाद्या गरजूला दान केल्याने रखडलेल्या कामांना गती मिळते, असे सांगितले जाते.
पैशाशी संबंधित समस्या असल्यास रविवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली चारमुखी दिवा लावावा. रविवारी घराच्या मुख्य दरवाजासमोर गायीच्या शुद्ध देशी तुपाचा दिवा लावा.
रविवारी मांस आणि मद्य सेवन करू नये.
असे मानले जाते की रविवारी काळ्या कुत्र्याला भाकरी, काळ्या गायीला भाकरी आणि काळ्या पक्ष्याला धान्य दिल्यास जीवनातील अडथळे दूर होतात.