मंगळवार, 13 जानेवारी 2026
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

रविवार : वारांचे उपवास आणि व्रत कैवल्य

ravivar upay
रविवार हा सूर्याचा आणि खंडोबाचा वार समजला जातो. रविवारआला की लोकं जेजुरी आणि कडेपाठाराला जात असे।या दिवशी एक वेळा उपवास केला जातो. सूर्य स्तुती करून सूर्याची स्तोत्रे वाचतात. सूर्य हे शक्ती आणि सामर्थ्याचे देव आहे. माणिक हे सूर्याचे रत्न आहे. डाळिंबी रंगाचे हे रत्न आपले रंग बदलून पुढील गोष्टींची सूचना देते. यामुळे मनाचे सामर्थ्य वाढून दुर्बळता दूर होते. आपल्या कुंडलीत सूर्याचे प्रभाव कमी पडू नये त्या साठी काही अश्या गोष्टी आहे ज्याने सूर्याचा प्रभाव कमी होतो. आणि आपल्याला अपयश मिळतो. ते मिळू नये त्या साठी काही गोष्टी करणे टाळावे. मग बघू या की रविवारी कोणत्या गोष्टी व्यर्ज आहे.
 
1 रविवारी मीठाचा उपयोग शक्यतो टाळावा.
2 बुटांचा वापर शक्यतो करणे टाळावे.
3 डोक्याच्या मालिशसाठी  सरसो तेल (मोहरी ) चा वापर करणे टाळावे.
4  मांस-मदिरेच्या सेवन करणे टाळावे.   
5 दूध उतू जाऊ देऊ नका.
6 शारीरिक संबंध करणे टाळावे.
6 पिंपळाला पाणी देणे तसेच पिंपळाची पूजा करणे टाळावे.
7 तुळस तोडू नये.
8 तांब्याचा वापर करू नये.
9 निळा,काळ,राखाडी रंगाचे वापर करणे टाळावे.
 
रविवारी करावया सारखी कामे.-
1 सूर्याला अर्ग्य देणे आणि सूर्याची पूजा करणे.
2  भैरवनाथाची पूजा करणे. 
3 सूर्य आणि भैरव मंत्राचे जाप करणे.
4 गूळ,तांबा,तांबडे चंदन, चे दान करणे.
हे उपाय केल्यास आपणांस सूर्याचे आशीर्वाद प्राप्त होऊन यश वैभव,सुख समृद्धीची प्राप्ती होईल.