गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Updated : रविवार, 5 मार्च 2023 (10:08 IST)

रविवारी हे करणे टाळावे, दारिद्रय येऊ शकतं

धार्मिक मान्यतांनुसार रविवार हा भगवान विष्णू आणि सूर्य देवाला समर्पित आहे. कुंडलीत सूर्य हा ग्रह धैर्य, शक्ती-आनंद, गती, आत्मविश्वास, आरोग्य इत्यादींचा कारक मानला जातो. दुसरीकडे, ज्यांच्या कुंडलीत सूर्य ग्रह कमजोर आहे त्यांच्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही खास उपायही सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे सूर्याची स्थिती मजबूत होण्यास मदत होऊ शकते. याशिवाय सूर्याला बलवान ठेवण्यासाठी आणि सूर्यनारायणाची कृपा मिळवण्यासाठी रविवारीही या गोष्टी करू नयेत.
 
1. मीठ खाऊ नका- 
ज्योतिष शास्त्रानुसार रविवारी जेवणात मीठ सेवन करणे वर्ज्य आहे. असे मानले जाते की या दिवशी मीठ खाल्ल्याने तुमच्या कामात समस्या वाढतात तसेच आरोग्यावरही परिणाम होतो.
 
2. पश्चिम दिशेला प्रवास करणे टाळा- 
रविवारी पश्चिम दिशेला प्रवास करणे देखील योग्य मानले जात नाही. जर काही आवश्यक काम असेल आणि पश्चिम दिशेला प्रवास करायचा असेल तर रविवारी सुपारी किंवा दलिया खाऊन घरातून बाहेर पडण्यापूर्वी पूर्व दिशेला 5 पावले चालावे आणि त्यानंतरच प्रवासाला निघावे.
 
3. काळे कपडे घालू नका- 
ज्योतिषांच्या मते रविवारी काळ्या- निळ्यासारखे गडद रंगाचे कपडे घालणे आणि तांबे किंवा सूर्य ग्रहाशी संबंधित कोणतीही वस्तू विकणे देखील निषिद्ध मानले जाते.
 
4. केस कापू नका- 
रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अनेकजण या दिवशी मुंडण, केस कापण्याची कामे करतात. पण ज्योतिष शास्त्रानुसार रविवारी केस कापल्याने कुंडलीतील सूर्य ग्रह कमजोर होतो, ज्यामुळे जीवनात दारिद्र्य येते.