गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

कुंडलीत हा ग्रह शुभ असेल तर जुळी मुलं होण्याचे योग बनतात

संतानं सुख हे जगातील अस सुख आहे जे प्राप्त करण्यासाठी लोक कुठे कुठे जात नाही, ते मिळविण्यासाठी काय काय करत नाही!
 
ज्या दंपतीला एका मुलाची आस असते आणि त्यांना जर जुळी मुलं झाले तर त्यांचा आनंद गगनात मावत नसल्यासारखी स्थिती होते. जुळ्यांना जन्म देण्याचा सौभाग्य फारच कमी लोकांना प्राप्त होतो. ज्योतिष शास्त्रानुसार जुळ्या मुलांसंबंधी काही विशेष योग घडून येतात, आणि हे योग ज्या स्त्रीच्या पत्रिकेत असतात तिला जुळे मुलं होतात.
 
जुळ्यांचे विशेष योग
- ज्या स्त्रीच्या पत्रिकेत पाचवा घरात गुरू स्वत:ची राशी धनू किंवा मीनमध्ये असेल किंवा मित्र राशीत असेल, आणि त्यावर सूर्य किंवा चंद्राची दृष्टी पडत असेल तर जुळ्या मुलांचा योग बनतो. या मुलांमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असते.
- वर दिलेल्या योगात जर शनीची दृष्टी असेल, तर एका मुलाच्या जीवाला धोका असतो.
- जर शुक्राची दृष्टी असेल, तर एकाच लिंगाचे मुलं जन्म घेतात, जसे दोन मुलं किंवा दोन्ही मुली.
- जर पत्नीच्या पत्रिकेत सातव्या स्थानावर राहू किंवा गुरू-शुक्र सोबत असतील तर, जुळे मुलं जन्माला येतात पण हा योग लग्नाच्या बऱ्याच वर्षानंतर घडतो.
Edited by : Smita Joshi