रविवार, 16 नोव्हेंबर 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शनिवार, 26 फेब्रुवारी 2022 (21:55 IST)

मार्चचा महिना या 4 राशींसाठी राहील खास, चतुर्ग्रही योगामुळे बदलेल त्यांचे भाग्य

The month of March will be special for these 4 zodiac signs
ज्योतिष शास्त्रानुसार मार्च 2022 मध्ये 3 ग्रहांची राशी बदलणार आहे. कोणताही ग्रह आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा जीवनावर खोलवर परिणाम होतो. 6 मार्च, रविवारी बुधाचे गोचर होईल. यानंतर १५ मार्चला सूर्य राशी बदलेल. त्यानंतर 31 मार्चला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल. मकर राशीत शनिदेव आधीच विराजमान आहेत. अशावेळी चतुर्ग्रही योग तयार होईल. ज्याचा सर्व राशींवर परिणाम होईल. परंतु, हा चतुर्ग्रही योग 4 राशींना जबरदस्त लाभ देईल. जाणून घ्या कोणत्या राशींना चतुर्ग्रही योगाचा फायदा होणार आहे.
 
3 ग्रह राशी बदलतील
रविवार, 6 मार्च रोजी बुध मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. त्यानंतर 18 मार्च रोजी बुध या राशीत अस्त होईल. यानंतर 24 मार्चला बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करेल. 15 मार्च रोजी सूर्य देव मीन राशीत प्रवेश करेल. मार्चच्या शेवटी म्हणजेच ३१ मार्चला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल. 
 
या 4 राशींना प्रचंड फायदे होतील
मेष: मेष राशीच्या लोकांना चतुर्ग्रही योगाचा मोठा फायदा होईल. या काळात नोकरीत कामगिरी चांगली राहील. नोकरीत प्रगती होईल. याशिवाय व्यवसायात आर्थिक प्रगती होईल. 
वृषभ :  या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत असेल. नोकरीत लाभाची भर पडेल. व्यवसायात उत्पन्न दुप्पट होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. 
तूळ :  नोकरीत बढतीसह उत्पन्न वाढेल. व्यावसायिक योजना यशस्वी होतील. वैवाहिक जीवनात आनंद राहील. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. 
वृश्चिक:  या राशीच्या लोकांसाठी चतुर्ग्रही योग खूप फायदेशीर सिद्ध होईल. नोकरीत तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. याशिवाय अनेक क्षेत्रांतून उत्पन्नाचे योग येतील. 
(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. वेबदुनिया याची पुष्टी करत नाही.)