Festival Posters
✕

मिथुन राशीत सूर्य राहू नंतर शुक्राचा प्रवेश

Updated: मंगळवार, 25 जून 2019 (16:09 IST)
 
मिथुन : शुक्राचा गोचर मिथुन राशीत होणार आहे. आर्थिक रुपेण ही वेळ तुमच्यासाठी फारच उत्तम आहे. जे जातक आपल्या वैयक्तिक जीवनात जोडीदाराची वाट बघत आहे त्यांना यात यश मिळेल. तुमच्या जीवनात कोणी महत्त्वाची व्यक्ती येणार आहे.   
 
कर्क : या गोचरामुळे तुमच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. हे खर्च कदाचित तुमच्यासाठीच राहतील पण घरातील वातावरण उत्तम राहणार आहे. पैशांमुळे तुमचे अडकलेले काम पूर्ण होतील. लव्ह लाईफ चांगली राहील.  
 
सिंह : सिंह राशीच्या जातकांसाठी हा गोचर लाभदायक ठरणार आहे. तुमच्यासाठी स्थिती अनुकूल राहणार आहे. तुमच्या खर्चांमध्ये कमी येईल ज्यामुळे तुम्ही बचत करू शकता. कुटुंबीयांची साथ मिळेल. कार्यक्षेत्रात देखील वेळ अनुकूल आहे. आरोग्य सामान्य राहणार आहे.  
 
कन्या : कन्या राशीच्या जातकांना या वेळेस आपल्या कामावर लक्ष देण्याची गरज आहे. ऑफिसमध्ये काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला फार मेहनत घ्यावी लागणार आहे.    यश मिळवण्यासाठी तुम्हाला आळशीपणा सोडावा लागणार आहे. रोमँटिक लाईफ चांगली राहणार आहे. जोडीदाराचा पूर्ण साथ मिळेल. तुम्हाला धनलाभाची संधी मिळेल.  
 
तुला : तुला राशीच्या जातकांसाठी सौभाग्यशाली वेळेची सुरुवात होऊ शकते. पण फक्त भाग्याच्या भरवशावर बसू नये. भाग्याचा साथ तेव्हा मिळेल जेव्हा तुम्ही मेहनत कराल. लव्ह लाईफमध्ये पार्टनरचा साथ मिळेल. आरोग्य चांगले राहील.  
 
वृश्चिक : या राशीच्या जातकांसाठी दांपत्य जीवनात थोडे चढ उतार येण्याची शक्यता आहे. तुम्ही जोडीदाराच्या आरोग्याबद्दल थोडे काळजीत असू शकता. मानसिकरीत्या देखील तुमच्यावर दाब राहण्याची शक्यता आहे. पार्टनरच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. मानसिक शांतीसाठी तुम्हाला ध्यान आणि योगाचा साथ घ्यायला पाहिजे. तुम्हाला निर्णय घेताना सुचणार नाही आणि तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकत.   
 
धनू : या गोचरामुळे तुमच्या जोडीदाराच्या इच्छाशक्तीवर प्रभाव पडू शकतो. असे ही होऊ शकत की तुम्हाला त्याचा साथ मिळणार नाही. कामाच्या क्षेत्रात स्थिती सामान्य राहणार आहे. आरोग्य उत्तम राहील.  
 
मकर : मकर राशीच्या जातकांनी सावधगिरी बाळगावी. तुमच्या शत्रूंची सख्या वाढू शकते. तुम्हाला मुलांच्या भवितव्याची काळजी राहील. धनप्रवाह हळू होईल. कार्यक्षेत्रात फोकस करण्याची गरज आहे. लोकांना तुमच्यातील चुका काढण्याची संधी देऊ नका. 
 
कुंभ : या राशीच्या लोकांना नाव आणि प्रसिद्धी मिळू शकते. धनलाभाचे संकेत मिळत आहे. तुम्ही स्वत:ला एका राजाप्रमाणे समजू शकता. तुम्ही जास्त मिळवण्याची अपेक्षा कराल. या दरम्यान तुम्ही थोडी मेहनत करून जास्त लाभ कमावू शकता. रोमँटिक लाईफ चांगली राहणार आहे. 
 
मीन : तुम्हाला तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. जर तुम्ही बर्‍याच वेळेपासून वाहन विक्रीचा विचार करत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी चांगली आहे. कार्यक्षेत्रात प्रगती होईल पण अपेक्षांपेक्षा कमी होईल. प्रवास करू नये. जर करणे गरजेचे असेल तर सावधगिरी बाळगा. 

सर्व पहा

Navratri 2026: नवरात्रीच्या नऊ रंगांची संपूर्ण यादी, कोणत्या दिवशी कोणता रंग आहे पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

शारदीय नवरात्र २०२६: घटस्थापना मुहूर्त, तिथी आणि संपूर्ण पूजा विधी

Shardiya Navratri 2026 Wishes Marathi शारदीय नवरात्रीच्या शुभेच्छा

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

पुढील लेख
Show comments