सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

7 हैराण करणार्‍या गोष्टी, ज्यामुळे नक्की मिळेल समाधान

लाल किताब याबद्दल अनेक लोकांना ऐकलं असेलच तर... तर आज आम्ही आपल्याला या बद्दल काही उपाय सांगत आहोत ज्यामुळे आपण जीवनात नक्कीच सकारात्मक फायदे जाणवाल. 
 
* चांदीच्या भांड्यात केशर घोळून त्याने कपाळावर तिलक केल्याने सुख- शांती, समृद्धी आणि प्रसिद्धी मिळते. हा उपाय गुरुवारी करणे योग्य ठरेल.
 
* विवाहात अडचणी येत असल्यास किंवा अभ्यासात समस्या येत असल्यास पिवळ्या रंगाच्या फुलांचे दोन हार लक्ष्मी-नारायण मंदिर अर्पित करावे, आपलं काम नक्की पार पडेल. हा उपाय देखील गुरुवारी करणे योग्य ठरेल. आपण गुरुवारी संध्याकाळी हा उपाय करावा.
 
* मंदिराच्या बाहेर बसलेल्या कुमारिकेला बदाम दिल्याने घरातील सर्व आजार दूर होतील. कुटुंबाचे आरोग्य चांगलं राहील. आपल्याला हा उपाय बुधवारी करायचा आहे. आणि बदाम देखील अख्खे असावे.
 
* नोकरीत ट्रांसफर याबद्दल कुठलीही समस्या असल्यास तांब्याच्या लोट्यात लाल मिरचीच्या बिया टाकून सूर्याला अर्घ्य दिल्याने समस्या दूर होते. आपल्या सतत 21 दिवस सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे.
 
* दारिद्र्य दूर करण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे दक्षिणावर्ती शंख. जिथे दक्षिणावर्ती शंख असतो तिथे दारिद्र्य थांबत नाही.
 
* एकाक्षी नारळच्या शीर्षावर तिनाऐवजी दोन बिंदू असतात. याची पूजा केल्याने घरात सुख- शांती मिळते आणि घरात देवी लक्ष्मीचा वास राहतो.
 
* गायीला आपल्या ताटातील पोळी खाऊ घालणारा सदैव सात्त्विक आणि आनंदी राहतो. तसेच गायीचं दूध सेवन केल्याने बळ आणि बुद्धीचा विकास होतं. गायचं मूत्र म्हणजे गोमूत्र घरात शिंपडल्याने किंवा घरात ठेवल्याने वाईट दृष्ट तसेच भूत-पिशाच्च दूर जातात.