शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: सोमवार, 17 एप्रिल 2023 (12:48 IST)

मौल्यवान रत्न घालणे शक्य नसल्यास ग्रहांच्या रंगाचा धागा बांधावा, यश मिळेल

लहान मुलांच्या हातावर किंवा गळ्यात काळा धागा बांधला जातो, जो त्यांना वाईट नजरेपासून वाचवतो हे समजले जाते. त्याचप्रमाणे इतर रंगांचे धागे देखील अनेक प्रकारचे अडथळे आणि त्रासांपासून संरक्षण करतात. जर तुम्ही मौल्यवान रत्ने घालू शकत नसाल तर ग्रहांच्या रंगाचा धागा बांधून पहा, तुम्हाला यश मिळेल...
 
विशेष: प्रत्येक व्यक्तीने आपल्या आवडत्या देवता किंवा ग्रहांच्या स्थितीनुसार रंग निवडला पाहिजे.
 
चला जाणून घेऊया कोणत्या रंगाचा धागा/रक्षसूत्र कोणत्या देवतेसाठी बांधावे.
 
* शनिदेवाच्या कृपेसाठी निळ्या रंगाचा सुती धागा बांधावा.
 
* बुध ग्रहासाठी हिरव्या रंगाचा मुलायम धागा बांधावा.
 
* गुरु आणि विष्णूसाठी पिवळ्या रंगाचा रेशमी धागा हातात बांधावा.
 
* शुक्र किंवा लक्ष्मीच्या कृपेसाठी पांढरा किंवा क्रिम रंगाचा रेशमी धागा बांधावा.
 
* शिवाच्या कृपेसाठी किंवा चंद्राच्या शुभ प्रभावासाठी पांढरा आणि गुलाबी धागाही बांधावा.
 
* राहू-केतू आणि भैरवाच्या कृपेसाठी तपकिरी-काळा धागा बांधावा.
 
* हनुमान किंवा मंगळाच्या कृपेसाठी हातात लाल रंगाचा धागा बांधावा.
 
* सूर्यदेवासाठी गडद केशरी रंगाचा किंवा सोनेरी रंगाचा धागा बांधावा.