शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Updated : शुक्रवार, 21 एप्रिल 2023 (09:29 IST)

जन्म महिना कोणता ? महिलांच्या स्वभावाशी संबंधित रहस्ये जाणून घ्या

ज्योतिष शास्त्रानुसार महिलांच्या स्वभावाशी निगडित रहस्य जाणून घेता येतात.
 
चैत्र महिना
चैत्र महिन्यात जन्मलेल्या महिला सुंदर, गोरं वर्ण, धनवान असतात. या महिला चांगल्या वक्ता, हुशार मात्र स्वभावाने रागीट असतात.
 
वैशाख महिना
या महिला ती मृदू स्वभावाच्या असतात. त्यांचे डोळे मोठे आणि सुंदर असतात. त्या एकनिष्ठ, श्रीमंत आणि क्रोधित असतात. त्यांचे हृदय सुंदर असतं.
 
ज्येष्ठ महिना
ज्येष्ठ महिन्यात जन्मलेल्या महिला धनवान असतात. या महिला नवर्‍यावर खूप प्रेम करतात. सर्व कार्यात कुशल असतता आणि तीर्थ स्थळांवर भ्रमण करतात.
 
आषाढ महिना
या स्त्रिया पैसाहीन असतात तथापि एक आनंददायी आणि साधा स्वभाव असल्यामुळे आपल्या पतीच्या लाडक्या असतात.
 
श्रावण महिना
श्रावण महिन्यात जन्मलेल्या महिला शरीराने लठ्ठ असतात. अशा स्त्रिया क्षमाशील स्वभावाच्या असतात. ते पवित्र, सुंदर आणि धार्मिक असतात.
 
भाद्रपद महिना
भाद्रपद महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया खूप गोड बोलतात. सर्व गोष्टींची काळजी घेतात आणि नेहमी आनंदी असतात.
 
आश्विन महिना
अशा स्त्रिया आनंदी, श्रीमंत आणि मनाने शुद्ध असतात. या महिला सुंदर आणि कामात कुशल असतात. कार्यक्षम असण्यासोबतच त्या अधिक उत्पादकही असतात.
 
कार्तिक महिना
कार्तिक महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया विकृत स्वभावाच्या असतात. त्या खूप हुशार असतात मात्र त्यांना खोटे बोलण्याची प्रवृत्ती असते. या महिलांना धन आणि सुख प्राप्त 
 
होते.
 
मागशीर्ष महिना
या महिन्यात जन्मलेल्या महिला शुद्ध आणि गोड बोलणाऱ्या असतात. या कार्यक्षम असतात. अशा स्त्रिया दया, परोपकार आणि धर्म संबंधी कार्य करतात.
 
पौष महिना
या समाजात गर्वाने राहतात. तथापि यांना राग येतो. यांची प्रवृती पुरुषांच्या समान असते आणि या पतीपासून विभक्त होतात.
 
माघ महिना
या महिन्यात जन्म घेणार्‍या महिला धनवान, सौभाग्यवती आणि बुद्धिमान संतानाने लाभल्या असतात. यांना कटु सत्य बोलण्याची सवय असते.
 
फाल्गुन महिना
फाल्गुन महिन्यात जन्म घेणार्‍या महिला सर्वगुणसंपन्न असतात. या धनवान आणि सुखी असतात. या महिला तीर्थ यात्रा करणार्‍या असतात.