परीक्षेची तयारी कशी करावी आणि त्यामध्ये यश मिळविण्यासाठीचे काही यशमंत्र

exam
Last Modified बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (19:28 IST)
बोर्डाच्या
परीक्षेचा निकाल आल्यावर जिथे आनंदाची सीमा नसते तिथे बऱ्याच ठिकाणी अनपेक्षित घडते. काही विद्यार्थी कमी नंबर आल्यावर किंवा नापास झाल्यावर नको ते पाउले उचलतात. हा एक गंभीर विषय आहे. असं म्हणतात की काहीही मिळविण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात. आजच्या स्पर्धात्मक युगात अभ्यास करणे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणं एखाद्या युद्धा प्रमाणे झाले आहेत. जर आपल्याला हे युद्ध जिंकायचे आहे त्यासाठी काही रणनीती बनवावी लागणार आणि त्यानुसार तयारी करावी लागणार.

सामान्यपणे योग्य मार्गदर्शनाच्या अभावी विध्यार्थी योग्य प्रकारे तयारी करू शकत नाही आणि परीक्षेच्या वेळी त्यांची धांदल उडते. त्यांना काळजी आणि भीती वाटू लागते. असं होऊ नये या साठी
आम्ही परीक्षे ची तयारी कशी करावी आणि त्यामध्ये यश कसे मिळवायचे या साठी काही यशाचे मंत्र सांगत आहोत.

1 कामाला टाळण्याची सवय सोडा-
आपल्याला यश मिळवायचे असल्यास कामाला टाळण्याची सवय सोडा. जे काम आवश्यक आहे त्याला योग्य वेळी करा. असं म्हणतात '' कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल मे प्रलय होएगी ,बहुरि करेगा कब ''. ह्याचा अर्थ आहे की उद्याच्या कामाला आज आणि आजच्या कामाला आत्ताच करून घ्यावं. एकदा काय वेळ निघून गेल्यावर काम करण्याचा काहीच अर्थ राहत नाही.
परंतु सध्याच्या काळात मुलांनी एक नवी म्हण तयार केले आहे मुलांच्यानुसार की कामाचे काय आहे, आज केले नाही तर उद्या करून घेऊ काय घाई आहे? परंतु वास्तविकता काय आहे हे सर्वांनाच माहीत आहे.आजच्या स्पर्धात्मक युगात जो थांबला तो थांबला म्हणून कामाला कधीही टाळू नये.

2 अभ्यासासाठी योग्य जागा निवडा-
अभ्यासासाठी शांत आणि योग्य जागा निवडावी. ज्या ठिकाणी एकाग्रतेने आणि शांत होऊन अभ्यास करू शकता. घर लहान असल्यास किंवा घरात जागा नसल्यास घराच्या बाहेर एखाद्या शांत ठिकाणी, मित्राकडे किंवा ग्रँथालयात जाऊन देखील अभ्यास करू शकता.

3 अभ्यासासाठी वेळा पत्रक बनवा-
विध्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी आवश्यक आहे की निश्चित वेळा पत्रक बनवावे. त्यामध्ये प्रत्येक विषयासाठी योग्य वेळ निश्चित करा.असं केल्यानं आपण प्रत्येक विषयावर नीट लक्ष देऊ शकता. केवळ वेळ पत्रक बनवू
नका त्यानुसार त्याचे पालन करा.

4 खेळ आणि करमणुकीसाठी वेळ द्या-
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासासह खेळ आणि करमणुकीकडे देखील वेळ दिला पाहिजे. या मुळे मुलांचा शारीरिक विकास होतो. आपण घरातच बुद्धी वाढणारे खेळ खेळू शकता.

5 लहान मोठ्या कामांची विभागणी करा-

कोणते ही मोठे काम करताना जेव्हा आपण काम करतो तेव्हा सुरुवातीला ते कठीण आणि अशक्य वाटत. परंतु नंतर त्याच कामाला आपण विभागून देतो. तर ते काम करणे सोपं होत. अशा प्रकारे अभ्यासासाठी देखील मोठे धडे किंवा फार्मुले देखील लहान विभागात वाटून सुलभ करता येऊ शकत. असं केल्यानं हे वाचायला सोपे होईल.

6 आपल्या ऊर्जेच्या पातळीला जाणून घ्या-
दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी प्रत्येक व्यक्ती ची शारीरिक आणि मानसिक ऊर्जेची पातळी वेगवेगळी होऊ शकते.काही लोक सकाळच्या वेळी तर संध्याकाळी तर काही लोक रात्रीच्या वेळी स्वतःला अधिक ऊर्जावान अनुभवतात. काही लोकांना सकाळी उठून वाचलेले लक्षात राहतात. तर काही लोकांना रात्री वाचलेले लक्षात राहतात. ज्या वेळी आपल्या
स्वतःला ऊर्जावान वाटेल तो वेळ आपण अभ्यासासाठी ठेवा.

7 अभ्यासाच्या मध्ये विश्रांती घ्या-
अभ्यास करताना मेंदू थकतो. कधी ही थकवा जाणवला तर आपण विश्रांती जरूर घ्या. अभ्यास करताना किमान 30 ते 40 मिनिटे विश्रांती घ्या.

8 मुख्य मुद्दे ठळक करा-
अभ्यास करताना एक हायलाईटर पेन घेऊन बसा, जर आपल्याला काही महत्त्वाचे नाव, तिथी,ठिकाण किंवा वाक्य दिसल्यास त्याला त्या पेनाने हायलाइट करा. अशा प्रकारे रिव्हिजन करताना खूप उपयोगी होईल.

9 आपले लक्ष निर्धारित करा- जीवनात आपल्या शिक्षणाची उद्दिष्टे ठरवा. कोणते धडे किती दिवसात संपवणार आहात किंवा कोणत्या विषयाकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे हे ठरवा. जर आपण आठवड्याचे, महिन्याचे लक्ष निश्चित करून काम कराल तर वर्षाच्या अखेरीस न घाबरता चांगल्या प्रकारे परीक्षेची तयारी करू शकाल.

10 सर्व इंद्रियांना समाविष्ट करा-
आपल्या पाचही इंद्रियाचा समावेश अभ्यासासाठी
करावा. पुस्तकांमधील चार्ट आणि चित्र लक्ष देऊन बघा. शक्य असल्यास लॅब मध्ये प्रॅक्टिकल करा किंवा त्या विषयाशी संबंधित मॉडेल स्पर्श करा.आजकाल पुस्तकांसह सीडी देखील मिळते .या मुळे धडा समजायला मदत मिळेल.


11 बुद्धी वाढीचे तंत्र वापरा-
मेमरी इम्प्रुव्हमेंट टेक्निक वापरा या मुळे आपल्याला मदत मिळेल.

12
संतुलित आहार घ्या-
संतुलित आहार घ्या. पिझ्झा,कोल्डड्रिंक, पास्ता सारखे जंक फूड घेणे टाळा.सकाळी चांगली न्याहारी घ्या, दुपारी हलकं जेवा आणि रात्री तर अधिक हलकं जेवा. शक्य असल्यास रात्री च्या जेवणात फक्त सॅलड किंवा लिक्विडच घ्या.

13 शरीरास निरोगी ठेवा-
शरीरास निरोगी ठेवणं महत्त्वाचं आहे. असं म्हणतात की एका स्वस्थ शरीरातच स्वस्थ मन राहत.सकाळी वॉक ला जावं आणि आपल्या सामर्थ्यानुसार व्यायाम करा.असं केल्यानं आपण स्वतःला सक्रिय आणि ऊर्जावान अनुभवाल.

14 प्रश्न सोडवा-
जर आपल्या मनात काही प्रश्न आहे किंवा एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर आपल्या शिक्षकाला विचारा. शक्यता आहे की वेळोवेळी तेच प्रश्न विचारल्यावर शिक्षक रागावतील पण जो विध्यार्थी काही शिकण्याची आवड ठेवतो तो विध्यार्थी सर्व शिक्षकांना आवडतो.

15 सर्व संसाधने वापरा-
अभ्यासासाठी सर्व संसाधने वापरा पुस्तक वाचा,ग्रँथालयात जावं,आपल्या मोठ्या भाऊ बहिणींकडून मार्गदर्शन घ्या. इंटरनेट आणि टेलिव्हिजन इत्यादी सर्व संसाधने आपल्या अभ्यासासाठी वापरा.

16 रिकामे कागदं वापरा-

अभ्यास करताना मुख्य मुद्दे लिहिण्यासाठी लहान लहान आकाराचे कागद ठेवा. हे कागदे आपल्याला रिव्हिजन करायला उपयोगी पडतील. परंतु लक्षात ठेवा की हे कागद आपल्याला परीक्षा साठी नक्कल म्हणून वापरायचे नाही .

17 स्वतःला प्रोत्साहित करा-
परीक्षे ला जाण्यापूर्वी स्वतःला प्रोत्साहित करा. आयुष्याच्या त्या गोष्टींना अथवा जेव्हा आपण यशस्वी झाला होता.त्यांना आठवा. स्वतःला विश्वास द्या की आपण चांगल्या मार्काने उत्तीर्ण होणार. अशा प्रकारच्या सकारात्मक विचारांमुळे मनोबल वाढेल आणि परीक्षेत चांगले प्रदर्शन कराल.

18 प्रश्न पत्र काळजीपूर्वक वाचा-
परीक्षा देण्यापूर्वी प्रश्नपत्र किमान दोन वेळा वाचा. हे निश्चित करून घ्या की पेपर मध्ये काय विचारले आहे. आणि ह्याचे उत्तर काय आहे. बऱ्याच वेळा घाई गडबडीत प्रश्न समजून न घेता चुकीचे उत्तर लिहून देतो.

19 अधिक प्रमाणात पाणी घ्या-
शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. शरीरातील पुरेसे पाणी मेंदूला सक्रिय करत.अभ्यास करताना आपल्या जवळ पाण्याची बाटली ठेवा आणि वेळो वेळी पाणी प्या.

20 शांत राहा-
परीक्षेत काही प्रश्न सुचत नसतील तर शांत राहा. घाबरून जाऊ नका. असं केल्यानं स्थिती बिघडू शकते. डोळे बंद करून विचार करा आणि शांत बसून दीर्घ श्वास घ्या.असं केल्यानं मनाला शांत करण्यास मदत मिळेल. मुख्य मुद्दे लक्षात आले तर त्यांना लिहून काढा.
अशा काही टिप्स अवलंबवून आपण यश प्राप्त करू शकता.यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

Relationships Tips :नशिबाने हे पाच प्रकारचे मित्र भेटतात, ...

Relationships Tips :नशिबाने हे पाच प्रकारचे मित्र भेटतात, त्यांना गमावू नका
जगातील प्रत्येक व्यक्तीला मित्र असतात. कुणाला कमी तर कुणाला जास्त, पण प्रत्येकाच्या ...

रेस्टॉरंट स्टाईलमध्ये पावभाजी बनवण्यासाठी या रेसिपी आणि ...

रेस्टॉरंट स्टाईलमध्ये पावभाजी बनवण्यासाठी या रेसिपी आणि कुकिंगच्या टिप्स फॉलो करा
हिवाळ्यात, रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्यासाठी आहारात भाज्यांचा समावेश करणे खूप महत्वाचे ...

Fengshui आपल्या जीवनात आनंद आणि प्रेमाला आर्कषित करतात या ...

Fengshui आपल्या जीवनात आनंद आणि प्रेमाला आर्कषित करतात या गोष्टी
वास्तूशी निगडीत चाइनीज ट्रेडिशन फेंगशुई नकारात्मक आणि सकारात्मक उर्जेबद्दल अनेक ...

आयुष्य कठीण अजिबात नसतं...

आयुष्य कठीण अजिबात नसतं...
आयुष्य कठीण अजिबात नसतं... कधी नळाला पाणी नसतं... कधी पाणी असून घोटभर देणारं कुणी ...

जिम जाणे योग्य की योगा करणे, जाणून घ्या अंतर

जिम जाणे योग्य की योगा करणे, जाणून घ्या अंतर
हल्ली अखाडाऐवजी जिमचा क्रेझ वाढत चालला आहे. आता प्रश्न असा आहे की जिममध्ये व्यायाम करणे ...