श्रीरामाचे हे 5 गुण जीवनात अमलात आणा, यशस्वी व्हा

shriram
Last Modified बुधवार, 21 एप्रिल 2021 (12:48 IST)
प्रभू श्रीरामांनी विपरित परिस्थितीमध्ये देखील धोरण सोडले नाही. त्यांनी वेद व मर्यादा पाळत सुखी राज्याची स्थापना केली. स्वत:च्या भावना आणि सुखांसोबत तडजोड करत न्याय आणि सत्याचे समर्थन केले. मग राज्य त्याग, बाली वध, रावण संहार किंवा सीतेला वन पाठवण्याचा प्रसंग का नसो, त्यांनी धैर्य ठेवून सर्व पार पाडले. त्याच्या जीवनातील 5 गुण अमलात आणून यशस्वी होता येऊ शकतं-
सहनशील व धैर्यवान
सहिष्णुता आणि संयम हा भगवान रामाचा एक विशेष गुण आहे. कैकेयीच्या आदेशानुसार, 14 वर्षे जंगलात घालवणे, समुद्रावर सेतु निर्माणासाठी तपस्या करणे, सीतेचा त्याग केल्यानंतर राजा असून संन्यासी प्रमाणे जीवन व्यतीत करणे हे त्यांच्या सहनशीलता आणि धैर्याचे गुण दर्शवतं.

दयाळू आणि योग्य स्वामी
प्रभू राम यांनी दया दाखवत सर्वांना आपल्या छत्रछायेत जागा दिली. त्यांच्या सेनते पशु़ मानव, दानव सर्व प्रकारे होते त्यांनी सर्वांना पुढे वाढण्याची संधी दिली. सुग्रीवला राज्य, हनुमान, जाम्बवंत व नल-नील यांना देखील त्यांना वेळोवेळी नेतृत्व करण्याचा हक्क दिला. मित्र केवट असो वा सुग्रीव, निषादराज असो वा विभीषण. प्रत्येक जाती, प्रयत्येक वर्गाच्या मित्रांसह प्रभू रामाने ‍हृद्याने नाते जपले. मित्रांसाठी स्वत:ने संकट ओढून घेतले.
उत्तम व्यवस्थापक
भगवान राम केवळ एक कुशल व्यवस्थापक नव्हते, तर सर्वांना सोबत घेऊन जाणार होते. ते प्रत्येकाला विकासाची संधी देत असून उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करत होते. त्यांच्या या गुणांमुळे लंका जाण्यासाठी त्यांनी व त्यांच्या सेनेने दगडांचा पूल तयार केला होता.

आदर्श भाऊ
भगवान रामाचे तीन भाऊ लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न सावत्र आईचे पुत्र होते तरी त्यांनी आपल्या सर्व भावांप्रती सख्खया भावांपेक्षा अधिक त्याग, समर्पण आणि प्रेमाचा भाव ठेवाला. या कारणामुळेच जेव्हा श्रीराम वनवासासाठी निघून गेले तेव्हा लक्ष्मण त्यांच्यासोबत त्यांची सेवा करण्यासाठी गेले आणि रामाच्या अनुपस्थितीमध्ये राजपाट मिळाल्यावर देखील भरताने प्रभू रामाचे मूल्य समजून सिंहासनावर त्यांच्या चरण पादुका ठेवून जनतेला न्याय दिलं.
भरतासाठी आदर्श भाऊ, हनुमानासाठी स्वामी, प्रजेसाठी नीति-कुशल व न्यायप्रिय राजा, सुग्रीव व केवटसाठी परम मित्र आणि सेनासोबत घेऊन चालणार्‍या व्यक्तिमत्व म्हणून रामाला ओळखलं जातं. त्यांच्या या सद्गुणांमुळेच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणून पूजलं जातं. हे देखील खरे आहे की एखाद्याचे गुण आणि कर्म यामुळे त्याची ओळख होते.


यावर अधिक वाचा :

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा ...

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'
केंद्र सरकार महसुलाच्या माध्यमातून मिळत असलेले पैसे योग्य प्रमाणात राज्य सरकारांना वाटप ...

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय
पीएम मोदींनी पुन्हा एकदा जगात एक जबरदस्त विजय मिळवला आहे. टाइम मासिकाने प्रसिद्ध केलेल्या ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का?
यूकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानंतर, यूकेतील 12 ते 15 वर्षं वयोगटातील ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपा आणि रा. स्व. संघ हे 'महिला विरोधी' आणि 'हिंदू ...

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम
कोकणामध्ये “कोकण आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम” राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या ...

Trataka Meditation:त्राटक ध्यान कसे केले जाते, फायदे देखील ...

Trataka Meditation:त्राटक ध्यान कसे केले जाते, फायदे देखील जाणून घ्या
त्राटक ध्यान मन आणि मन शांत करण्यासाठी अनेक प्रकारे ध्यान केले जाते. ध्यानाच्या मदतीने ...

जर तुम्ही केस गळण्याने त्रस्त असाल तर तुमच्या आहारात हे 5 ...

जर तुम्ही केस गळण्याने त्रस्त असाल तर तुमच्या आहारात हे 5 पदार्थ नक्की समाविष्ट करा
Food To Stop Hair Fall: केस गळणे थांबवण्यासाठी अन्न: पावसाळ्यात केस गळणे सामान्य आहे, ...

प्राण्यांविषयीच्या मनोरंजक तथ्यांवर आधारित महत्त्वाच्या ...

प्राण्यांविषयीच्या मनोरंजक तथ्यांवर आधारित महत्त्वाच्या गोष्टी
* हत्ती त्याच्या ट्रंकमध्ये 5 लिटर पाणी ठेवू शकतो. * आफ्रिकन हत्तीच्या तोंडात फक्त चार ...

शिवाजी गोविंदराव सावंत ; 'मृत्युंजय'कर शिवाजी सावंत

शिवाजी गोविंदराव सावंत ;  'मृत्युंजय'कर शिवाजी सावंत
शिवाजी सावंत यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९४० साली सामान्य शेतकरी कुटुंबात, कोल्हापूर जिल्ह्यातील ...

कोरोनाचे नवीन औषध, 5 दिवसांसाठी फक्त 600 रुपये खर्च - ...

कोरोनाचे नवीन औषध, 5 दिवसांसाठी फक्त 600 रुपये खर्च - सीडीआरआय
कोरोना विषाणू रोखण्यासाठी सातत्याने संशोधन चालू आहे. शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतींचा ...