साखर ऐवजी डाएट मध्ये सहभागी करा या वस्तू, आरोग्य राहील सुरक्षित
तुम्ही जर गरजेपेक्षा जास्त साखर सेवन करीत असला तर हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. अति साखरेचे सेवन वजन वाढवते. तसेच अनेक गंभीर आजार तुम्हाला घेरू शकतात.
आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण आपल्या जीवनशैलीकडे लक्ष देत नाही. तसेच अयोग्य आहार देखील घेतात. ज्यामुळे अनेक आजार मानवी शरीराला घेरतात. म्हणून आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. साखर देखील त्याचा फूड मध्ये येते जे तुम्हाला नुकसान पोहचवू शकतात. म्हणून साखरेच्या ऐवजी तुम्ही या काही वस्तूंचा डाएट मध्ये किंवा आहारामध्ये सहभागी करा. त्या कोणत्या वस्तू आहे तर चला जाणून घेऊ या.
गूळ-
गुळामध्ये आयरन, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नाशीयम, मॅगनीज यांसारखे अनेक पोषकतत्वे असतात. याचे सेवन तुम्हाला एनिमिया पासून सुरक्षित ठेवते. सोबतच या मध्ये असलेले कॅल्शियम हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात. साखरेच्या ऐवजी गुळाचे सेवन आरोग्यासाठी चांगले असते.
कोकोनट शुगर-
नारळामध्ये कॅल्शियम, मॅग्नाशीयम, व्हिटॅमिन सी, प्रोटीन, सोडियम, फॉस्फोरस, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी सारखे पोषकतत्वे असतात. ज्याच्या सेवनाने शरीराला शक्ती मिळते. तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहतात. अशावेळेस कोकोनट शुगर तुम्ही डाएट मध्ये सहभागी करू शकतात.
मध-
मधामध्ये व्हिटॅमिन सी, बी, अँटीऑक्सीडेंट, एंजाइम्स सारखे गुण असतात. जे डायबिटीज रुग्णानासाठी फायदेशीर असते. तसेच यामध्ये नैसर्गिक शुगर असते. म्हणून डाएट मध्ये साखरे ऐवजी मधाचा उपयोग करावा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik