मानसिक आरोग्य प्रभावित करते आयरनची कमी, जाणून घ्या लक्षण
आयरन आपल्या शरीरासाठी महत्वपूर्ण असते. जे महत्वपूर्ण भूमिका निभावते. हे लाल रक्त पेशींच्या उत्पादनामध्ये मदत करते. जे पूर्ण शरीरात ऑक्सिजन पोहचवण्याचे काम करते. आयरन स्नायूंचे कार्य, रोगप्रतिकात्मक शक्ती आणि मेंदूच्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण असते.
आयरनच्या कमतरतेमुळे एनिमिया होऊ शकतो. जी एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीरात योग्य प्रमाणात लाल रक्त पेशी नसते. एनिमिया लक्षणांमध्ये थकवा, अशक्तपणा, श्वास घेण्याची समस्या, डोके दुखी, चक्कर येणे, मानसिक आरोग्य बिघडणे, चिंता यांसारख्या समस्या येतात.
आयरनची कमी लक्षणे
1. आयरनची कमी झाल्यास लाल रक्त पेशींची संख्या कमी होते. ज्यामुळे शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे थकवा जाणवतो.
2. आयरनची कमी असतांना शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. ज्यामुळे श्वास घ्याल त्रास होतो. खासकरून व्यायाम करतांना ही समस्या येते.
3. आयरनची कमीमुळे ही समस्या डोके दुखी वाढते. आयरनची कमीमुळे मेंदूपर्यंत पुरेश्या प्रमाणात ऑक्सिजन पोहचत नाही.
4. आयरनची कमीमुळे चाकर देखील येऊ शकते. कारण आयरनची कमीमुळे रक्तचाप कमी होऊ शकतो.
5. आयरनची कमीमुळे त्वचा, नखे, केस यांमध्ये बदल होऊ शकतो. केस गळू शकतात, त्वचा पिवळी पडून कोरडी होऊ शकते. नखे पातळ होऊ शकतात.
आयरनची कमी मानसिक आरोग्य बिघडू शकते. आयरन सेरोटोनिन आणि डोपामाइन सारख्या न्यूरोट्रान्समीटरचे उत्पादन करते. जे मूड नियंत्रित करते. याकरिता शरीरातील आयरन कमी होऊ नये म्हणून आयरननी भरलेले खाद्यपदार्थ भरपूर खावे. जसे की, मांस, मासे, बीन्स, डाळ, हिरव्या पालेभाज्या, सुखामेवा, कडधान्य हे आयरनची कमी भरून काढतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik