suvichar

आरोग्यदायी खरबूजचे 8 फायदे जाणून घ्या

शनिवार, 13 मार्च 2021 (19:18 IST)
उन्हाळ्यात मिळणारा खरबूज रसाळ आणि पाण्याने भरलेला आहे. चविष्ट असण्यासह हे सौंदर्यासाठी देखील फायदेशीर आहे . चला तर मग ह्याचे फायदे जाणून घ्या. 
 
1 खरबूज शरीरातील पाण्याची कमतरता दूर करतो आणि या मध्ये असलेले व्हिटॅमिन आणि खनिजे ऊर्जावान ठेवण्यात मदत करतो. हे त्वचेला हायड्रेट ठेवण्यात मदत करतो. 
 
2 या मध्ये मुबलक प्रमाणात अँटी ऑक्सीडेन्ट आढळतात, जे वाढत्या वयाला रोखण्यासह तणाव देखील कमी करतो. त्वचेला देखील तरुण ठेवण्यात मदत करतो. 
 
3 खरबूज नियमितपणे खाल्ल्याने हृदयविकाराच्या झटक्यापासून वाचवतो . रक्त नलिकांमधील होणाऱ्या गुठळ्यांपासून रोखतो अशा प्रकारे आपण हृदयविकाराच्या झटक्यापासून वाचू शकता.
 
4 खरबूजाचे गीर चेहऱ्यावर लावल्याने हे त्वचेसाठी फायदेशीर आहे. या मुळे उन्हात भाजलेली त्वचा ठीक होते त्वचेमधील  ओलावा टिकून राहिल्याने ताजेपणा दिसून येतो.
 
5 खरबूजामध्ये असलेले व्हिटॅमिन ए डोळे आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. या मध्ये बीटा कॅरोटीन आढळतो.जे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. 
 
6 वजन कमी करण्यासाठी देखील खरबूज फायदेशीर आहे. या मध्ये मुबलक प्रमाणात फायबर आणि पाणी आहे. या शिवाय साखरेचे प्रमाण देखील कमी आहे. या मुळे वजन वाढत नाही. 
 
7 पचन संबंधी समस्या असल्यास अन्नासह किंवा या व्यतिरिक्त देखील खरबूज आपल्या आहारात समाविष्ट करावे. हे पचन आणि बद्धकोष्ठता च्या समस्येमध्ये फायदेशीर आहे.   
 
8 उन्हाळ्यात पोटात आणि शरीरात उष्णता वाढते. या पासून वाचण्यासाठी खरबूज चांगला आहे. हे पोटातील उष्णता कमी करून उष्णतेच्या दुष्प्रभावाला कमी करतो.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

पावसाळ्यात कच्च्या दुधाने करा त्वचेची काळजी, चेहरा दिसेल उजळ आणि तजेलदार

भिजल्यानंतर लगेच आंघोळ करावी का? डॉक्टर काय सांगतात?

चिमुकल्याच्या स्वागतासाठी तयार ठेवा या महत्त्वाच्या वस्तू

नैतिक कथा : गोष्ट हुशार मासा आणि धूर्त माकडाची

"काकडी कडू निघाली म्हणून फेकून देताय? थांबा! या सोप्या युक्त्या वापरून कडूपणा २ मिनिटांत दूर करा

पुढील लेख
Show comments