गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 13 मार्च 2021 (08:35 IST)

व्यवस्थित आणि शांत झोप येण्यासाठी हे करा

संपूर्ण दिवस काम केल्यावर थकवा येतो आणि त्यानंतर आरामदायी  आणि शांत झोप येते. परंतु काही लोकांना दिवसभरच्या थकव्यानंतर देखील रात्री शांत आणि व्यवस्थित झोप येत नाही. त्याचे अनेक कारणे होऊ शकतात. आम्ही सांगत आहोत काही उपाय ज्यांना अवलंबविल्याने आपण रात्री शांत आणि सुखाची झोप घेऊ शकता. 
 
1 दररोज सकाळी उठून व्यायाम करा. 
 
2 चांगली आणि शांत झोप घेण्यासाठी दिवसां झोपू नका आणि झोपण्यापूर्वी मद्यपान किंवा कॅफिन चे सेवन करू नका.
 
3 धूम्रपान करू नका. कारण सिगारेट मध्ये निकोटीन आढळतो ज्यामुळे झोप येत नाही. 
 
4 आपण संध्याकाळी कसरत किंवा व्यायाम करू नका.या मुळे रात्री झोप येणार नाही. 
 
5 अनेक प्रकाराचे ड्रग्स देखील आरामशीर आणि शांत झोप येण्यात बाधक आहे. 
 
6 ज्या स्त्रियांच्या शरीरात आयरनाची कमतरता असते त्यांना देखील रात्री झोप येत नाही. म्हणून शरीरात आयरानाची कमतरता होऊ देऊ नका. 
 
7 सकाळी उठल्यावर सूर्याचा प्रकाश घरात येऊ द्या. कारण योग्य प्रकाशामुळे देखील शरीराला योग्य ऊर्जा मिळते. 
 
8 रात्री झोपताना लक्षात ठेवा की झोपण्याच्या खोलीत प्रकाश कमीच असावा. या मुळे चांगली, व्यवस्थित आणि शांत झोप लागेल. 
 
हे उपाय अवलंबवा आणि चांगली आणि शांत झोप घ्या आणि पुन्हा आयुष्याला नवीन ऊर्जेसह जगण्यासाठी स्वतःला सज्ज करा.