सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 मार्च 2021 (21:35 IST)

चाचण्या वाढवून कन्टेन्मेंट झोनची उपाययोजना प्रत्यक्षात आणा मुख्य सचिव

राज्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा जिल्हानिहाय आढावा मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी घेतला. यावेळी त्यांनी चाचण्या वाढवून कन्टेन्मेंट झोनची उपाययोजना प्रत्यक्षात आणण्याचे तसेच कोरोना निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. याशिवाय नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा अतिरेक न करण्याच्याही सूचना केल्या आहेत.
 
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मुख्य सचिव सीताराम कुंटे सध्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख यांच्याशी संवाद साधून आढावा घेत आहेत. 
 
राज्यातील काही जिल्ह्यांचा कोरोना रुग्ण संख्येचा पॉझिटीव्हीटी दर जास्त असून जिल्हा प्रशासनाने कोरोना निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करतानाच चाचण्यांची संख्या वाढवा. कन्टेन्मेंट झोनची उपाययोजना प्रत्यक्षात आणा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करताना अतिरेक होऊ देऊ नका, अशा सूचना दिल्या.