पुन्हा देऊळ बंद, शेगाव, पंढरपूरसह अनेक मंदिरांचे दारं दर्शनासाठी बंद
महाराष्ट्र राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढतच आहे. कोरोना अटोक्यात आल्याचे बघून लोकांन सर्रास फिरायला सुरुवात केली होती. पण कोरोनाचा पुन्हा वाढत असलेला प्रार्दुभव बघत राज्यातील अनेक मंदिरांचे दारं पुन्हा भाविकांसाठी बंद होत असल्याचे चित्र आहे. पंढरपूरचे मंदिर आज आणि उद्या असे 48 तास बंद असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांचे मंदिर पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहे.
ताज्या आकड्याप्रमाणे गेल्या 24 तासांमध्ये देशात 14 हजार रुग्ण सापडले आहे आणि त्यातून धक्कादायक बाब म्हणजे त्यापैकी 7 हजारांहून अधिक रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात बंदोबस्त कडक केला आहे.
माघी यात्रेपुर्वीच वारकऱ्यांनी पंढरपुरातील मठामध्ये मुक्काम केला असताना पोलीस प्रशासाने मठाधिपतींवर गुन्हा दाखल करणार असल्याची नोटीस पाठविल्या आहेत. पोलिसांनी तपासणी बघत सुमारे 40 हजार भाविक आपल्या गावी यात्रेपुर्वीच परतले असून पंढरपूर रिकामे होत आहे. आता पंढरपूर हद्दीवर कडक नाकाबंदी करण्यात आली असून पंढरपूरात येणाऱ्या वाहनधारकांचे नाव, मोबाइल नंबर घेतले जात आहे.
तसेच शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांचे मंदिर पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशाचे पालन करीत संस्थानाने हा निर्णय घेतला आहे. येथे पुढील आदेशापर्यंत श्रींच्या दर्शनासाठी भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही.