शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 मार्च 2021 (21:30 IST)

या सरकारचा राज्यातील जनतेला त्रास झाला आहे : नितेश राणे

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने १४ मार्चला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा  केल्याची घोषणा केल्यावर पुण्यासह राज्यभरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनानंतर आता २१ मार्च रोजी ही परीक्षा होणार आहे. यातच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला असून, या सरकारचा राज्यातील जनतेला त्रास झाला आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. 
 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला परीक्षा पुढे ढकलायची होती, तर मग हॉलतिकिटे कशाला काढली? विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान सरकार भरून देणार का?, अशी विचारणा नितेश राणे यांनी केली. परीक्षा पुढे गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे. राज्य सरकारने याची नुकसान भरपाई दिली पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.