गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 मार्च 2021 (21:00 IST)

महिलांचे 8 प्रकाराचे त्रास दूर करतो हे आसन

best yogsan
योगाने प्रत्येक आजाराला बरे केले जाऊ शकते. योगासनांपैकी एक योगासन असे आहे हे महिलांच्या 8 प्रकारच्या समस्या दूर करतो चला तर मग जाणून घेऊ या. महिलांना मासिक पाळी किंवा गर्भावस्थेत खूप त्रास सहन करावा लागतो. अनेक आरोग्याच्या अशा समस्या आहेत ज्यांना महिलांना सहन करावे लागते हे योगासन करून महिलांचे त्रास कमी होतील.चला तर मग जाणून घेऊ या कोणते आहे हे आसन . 
 
* फुलपाखरू आसन-हे आसन केल्याने महिलांच्या आरोग्याशी निगडित त्रास नाहीसे होतात. चला तर मग हे आसन कसे करावे जाणून घेऊ  या 
 
हे आसन करण्यासाठी दोन्ही पाय समोर करून सरळ बसा. पाठीचा कणा सरळ ठेवा. 
दोन्ही पाय दुमडून हाताचे बोट पायाच्या पंज्यावर ठेऊन आपसात जोडून द्या.
टाचा एकमेकांना लागलेल्या असाव्यात. 
सामान्य स्थितीत श्वास घेत दोन्ही पाय वर न्या आणि खाली आणा. असं आपल्याला 15 ते 20 वेळ करायचे आहे. 
 
या आसनाचे फायदे- 
या आसना मुळे महिलांच्या 8तक्रारी दूर होतात. 
* मासिक पाळीमध्ये होणारी वेदना कमी करतो.
* गर्भावस्थेच्या वेदना कमी करतो. 
* गर्भावस्थेच्या तणावाला दूर करतो. 
* जास्त काळ उभे राहणाऱ्या महिलांसाठी फायदेशीर.
* रजोनिवृत्तीसहज होते.
*  प्रजनन अवयव बळकट होतात.
* बदलणाऱ्या मूडसाठी मदत करतो. 
* वंधत्व बरा होतो.