1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. स्वतःला घडवताना
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 मार्च 2021 (18:58 IST)

यश कसे मिळवाल उंच उडी मारण्यासाठी पाऊले मागे टाकावे

motivational how to get success
उंच उडी मारण्यासाठी पाऊले मागे टाकावे.लहानपणी प्रत्येक जण या स्पर्धेत भाग घेतात की कोण सर्वात जास्त उंच उडी घेऊ शकतो.आपण बघितले असणार की उंच उडी टाकण्यासाठी काही पाऊले मागे घ्यावे लागतात. असं शक्य नाही की उंच उडी मारण्यासाठी त्याच जागे वरून उडी घेतल्यावर आपण दुसरी कडे पोहोचतात. उंच उडी मारण्यासाठी जेवढे मागे होता उडी तेवढीच उंच घेतली जाते. कारण या साठी त्याला अतिरिक्त शक्ती मिळते. 
लॉग जँप किंवा उंच उडी मारताना देखील हेच होते. या मध्ये दोन पद्धतीने उडी घेतात. एक तर काही पाऊले मागे घेत हाताची सायकिल करून लाईन वर उडी घेतात. आणि दुसरे खाली बसून उंच उडी घेतात. म्हणजे उंच उडी घेण्यासाठी या तर मागे पाऊले टाकून उंच उडी घेतात किंवा वाकून उंच उडी घेतात. अशा प्रकारे आपल्याला देखील आयुष्यात पुढे वाढायचे असल्यास मागे जाऊन आरामदायक स्थितीमध्ये जाऊन उंच उडी घ्यावी लागेल आणि दुसरे की खाली वाकून उडी घ्यावी लागेल. मागे जाण्याचा अर्थ आहे की आपण आयुष्यात काही लक्ष्य ठरवा आणि ते लक्ष्य साध्य करण्यासाठी आपले पूर्ण प्रयत्न करा, त्यासाठी ची योजना बनवा आणि मग त्या लक्ष्याची प्राप्ती करण्यासाठी आपली पूर्ण शक्ती  लावा. जर मार्गात अडथळे येत आहेत किंवा अपयश मिळत आहे त्यासाठी आपण नवीन मार्ग निवडा किंवा त्याच मार्गावर चालण्यासाठी उंच उडी घ्या.
आयुष्यात काहीही मिळविण्यासाठी उंच उडी घ्यावी लागते आणि त्यासाठी काही जोखीम देखील घ्यावे लागतात. त्या शिवाय यश मिळू शकत नाही. काहीही लक्ष्य साध्य करण्यासाठी जोखीम घ्या , योजना बनवून त्यावर काम करा आणि यश मिळवा. अपयश मिळाल्यावर घाबरून जाऊ नका.किंवा लक्ष्य अर्ध्यावर सोडू नका. अडथळांना घाबरून न जाता प्रत्येक परिस्थितीला सामोरी जावे.आपण उंच उडी घेण्यासाठी मागे पाऊल टाकून देखील यश मिळवू शकता.आणि आपल्या स्वप्नांना पूर्ण करू शकता.