रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 मार्च 2021 (19:37 IST)

कोरोनावर नियंत्रणासाठी मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घ्यावे चंद्रकांत पाटील यांची मागणी

कोरोनावर नियंत्रण राखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यात कुठे ही लॉकडाऊन लागणार नाही असे सांगून मुख्यमंत्र्यांनी धोरणात्मक नियमावली आखायला पाहिजे. अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. सकाळी ते माध्यमाशी बोलताना सांगत होते की त्यांनी उपमुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन पुण्यातील प्रश्नाबाबत चर्चा केली.  
ते म्हणाले की कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी लॉक डाऊन होणार नाही ही काळजी सर्वानी घेऊन कोरोनाच्या नियमावलीचे पालन केले पाहिजे. ज्या ठिकाणी कोरोनाचे प्रमाण जास्त आहे तिथे नियमाची अंमलबजावणी झालीच पाहिजे. नागरिकांनी त्या नियमावलीचे पालन करावे या साठी प्रशासनाने सक्ती केली पाहिजे. ते म्हणाले की ज्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे जसे की मॉल,रेस्टारेंट,उद्याने अशा ठिकाणी बंदी घालावी. जेणे करून कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांवर आळा घालता येईल.