बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 मार्च 2021 (17:13 IST)

एमपीएसी विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मागणी करणार - महेबुब शेख

मुंबई- एमपीएसी परिक्षेसंदर्भात राज्यभर आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मागणी करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिली. 
 
एमपीएसीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेण्याबाबत हे राज्यसरकार गांधीजींचे विचार मानणारे असल्यामुळे २४ तासात निर्णय बदलला परंतु केंद्रसरकार सारखे हिटलरचे विचार मानणारे असते तर १०० दिवस होऊनही शेतकरी आंदोलनाकडे पाहिले नाही तसे झाले असते याची आठवण महेबूब शेख यांनी करुन दिली आहे. 

गेल्या ५ वर्षामध्ये भरती न करणार्‍या भाजपवाल्यांचे पुतणा मावशीचे प्रेम राज्यातील युवकांना माहित आहे असेही महेबूब शेख म्हणाले.