मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 मार्च 2021 (20:34 IST)

राज्यात दिवसभरात 15,817 नवे कोरोना रुग्ण, 56 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

महाराष्ट्रात कोरोनामुळे चिंता वाढतच चालली आहे. आज शुक्रवारी राज्यात दिवसभरात 15,817 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात दिवसभरात 56 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. राज्यात दिवसभरात 11,344 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे तर राज्यात सध्या 1 लाख 10,485 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
 
इतर शहरांकडे नजर टाकली तर पुण्यात दिवसभरात 1805 रुग्णांची वाढ झाली असून 598 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आहे तसेच 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असून येथे दिवसभरात 1135 नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच दिवसभरात 456 रुग्ण बरे झाल्याची नोंद आहे तर दिवसभरात 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 
जनतेच्या बेपर्वाईनं वाढतंय कोरोनाचं संकट वाढतच आहे. अशात नागपूरमध्ये 15 ते 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर पुण्यामध्ये निर्बंध आणले जाणार असून 31 मार्चपर्यंत शाळादेखील बंद ठेवण्यात येतील. ज्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहेत, त्यापैकी पुणे देखील एक आहे. तसेच अकोला जिल्ह्यात आज रात्रीपासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. येथे शुक्रवारी रात्री आठ वाजेपासून 15 मार्चला सकाळी 6 वाजेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. 
 
राज्य सरकारकडून जारी निर्देशांनुसार राज्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सुविधा वगळता इतर सगळं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.