मंगळवार, 30 सप्टेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By

Ganesh Chaturthi 2025 गणपती बाप्पाला नैवेद्यात बनवा पारंपारिक पदार्थ पुरण पोळी

puranpoli
पुरण पोळी ही महाराष्ट्रीयन पकवान आहे, जी खासकरून गणेशोत्सव किंवा इतर सणांमध्ये बनवली जाते. 
पुरण बनवण्यासाठी साहित्य- 
एक वाटी- चणा डाळ 
एक वाटी- गूळ किसलेला 
अर्धा टीस्पून- वेलची पावडर
चिमूटभर- जायफळ पावडर  
एक टेबलस्पून- तूप
पोळीसाठी साहित्य- 
दोन वाट्या- गव्हाचे पीठ  
अर्धा टीस्पून- मीठ
एक टेबलस्पून तेल किंवा तूप
पाणी 
तूप 
कृती-
सर्वात आधी चणा डाळ स्वच्छ धुवा आणि कुकरमध्ये 3-4 शिट्ट्यांपर्यंत शिजवा. आता डाळ मऊ झाली पाहिजे, पण पाण्यात पूर्ण विरघळू नये. शिजलेली डाळ गाळून अतिरिक्त पाणी काढून टाका. आता गुळगुळीत पेस्ट करण्यासाठी मिक्सर ग्राइंडर किंवा पुरणाची मशीन घ्या. व पुरण बारीक करा. आता एका कढईत एक टेबलस्पून तूप गरम करा. पुरण घाला आणि मंद आचेवर दोन  मिनिटे परतून घ्या. आता गूळ घाला आणि मिश्रण एकजीव होईपर्यंत ढवळत राहा. गूळ पूर्णपणे वितळला पाहिजे. वेलची पावडर आणि जायफळ पावडर घाला. मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत राहा. पुरण थंड होऊ द्या. थंड झाल्यावर त्याचे छोटे-छोटे गोळे बनवा. आता एका परातीत गव्हाचे पीठ, मीठ आणि तेल/तूप मिक्स करा. हळूहळू पाणी घालून मऊ आणि लवचिक कणकेचा गोळा भिजवा. आता कणीक 15-20 मिनिटे झाकून ठेवा. आता कणकेचे छोटे-छोटे गोळे बनवा.  एका गोळ्याला लाटून त्यावर पुरणाचा गोळा ठेवा.
कणीकेच्या कडा एकत्र करून पुरण आत बंद करा आणि पुन्हा हलक्या हाताने गोळा लाटून पोळी बनवा.  गरम तव्यावर पोळी टाका, दोन्ही बाजूंनी तूप लावून मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. तर चला तयार आहे आपली गरमागरम पुरण पोळी, गणपती बाप्पाला नैवेद्यात नक्की ठेवा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik