बेसन लाडू स्वादिष्ट प्रसाद; गणपती बाप्पांसाठी खास रेसिपी
साहित्य-
दोन वाट्या- बेसन
एक वाटी- पिठीसाखर
अर्धी वाटी- तूप
१/४ टीस्पून- वेलची पावडर
काजू किंवा बदाम
केशराच्या काड्या दूधात भिजवलेल्या
एक टेबलस्पून- दूध
कृती-
सर्वात आधी एका जाड बुडाच्या कढईत मंद आचेवर तूप गरम करा.
तूप वितळल्यावर त्यात बेसन घाला. मंद आचेवर सतत ढवळत बेसन भाजून घ्या.
१५-२० मिनिटे बेसन भाजावे, जोपर्यंत त्याचा रंग हलका तपकिरी होत नाही आणि खमंग सुगंध येत नाही. भाजताना १ टेबलस्पून दूध शिंपडा, यामुळे बेसनाला चांगली रंगत येते आणि लाडू मऊ होतात. आता बेसन भाजून झाल्यावर ते एका मोठ्या थाळीत काढा आणि थंड होऊ द्या. थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर, वेलची पावडर आणि चिरलेले काजू/बदामआणि केशर मिसळा. सर्व साहित्य चांगले एकत्र मिसळा. जर मिश्रण खूप कोरडे वाटले तर थोडे तूप घालू शकता. मिश्रण हाताने चांगले मळून घ्या. मिश्रणातून छोटे-छोटे लाडू वळा. चला तर तयार आहे बेसन लाडू प्रसाद, गणपती बाप्पांसाठी नैवेद्यात नक्की ठेवा. लाडू थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik