बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 मार्च 2021 (21:21 IST)

किरीट सोमय्या यांचा पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा

कोरलाई जमीन प्रकरणावरून भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. नाईक कुटुंबीयांना पुढे करून मुख्यमंत्री पैशांची अफरातफर करत आहेत मात्र उद्धव ठाकरेंनी हे लक्षात ठेवावं की तुमची गाठ माझ्याशी आहे तुम्हाला सगळे पैसे द्यावेच लागतील आणि चौकशीला सामोरे जावेच लागेल असं विधान किरीट सोमय्या यांनी केले आहे. 
 
दरम्यान अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीने गुरुवारी पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांच्यावर प्रश्न उपस्थित केले होते. किरीट सोमय्या यांचा जीव वर-खाली का होतोय ठाकरे कुटुंब आणि अनुभवी नाईक यांच्यात झालेल्या जमीन व्यवहारात किरीट सोमय्या इतका रस का घेत आहेत, असा सवाल त्यांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांवर टीकेची तोफ डागली यावेळी त्यांनी नाईक कुटुंब यावर माझी हरकत नसल्याचे म्हटले आहे. परंतु कोरलाई जमीन घोटाळा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. मार्च महिना आला मुख्यमंत्री उत्तर का देत नाही आहेत? १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१९ पर्यटन अन्वय नाईक यांच्या नावाने प्रॉपर्टी टॅक्स भरला, याचं उत्तर का देत नाही आहेत? असा सवाल सोमय्या यांनी केला आहे.