गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 मार्च 2021 (21:17 IST)

म्हणून राज ठाकरे यांनी ऐनवेळी कार्यक्रम केला रद्द

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात नव्याने नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटीचं आयोजन केलं होतं. मात्र ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. याच संदर्भातील माहिती पुण्यातील मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली आहे.
 
प्रत्येक पदाधिकाऱ्यांसोबत किमान एक व्यक्ती जरी आला तरी या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला येणाऱ्यांची संख्या शंभर ते दीडशे होईल. त्यामुळे गाठीभेटी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं वागस्कर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. तसेच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पुण्यात मोजक्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला जाईल. या मेळाव्याला मनसे अध्यक्ष उपस्थित असतील असं वागस्कर यांनी सांगितलं आहे.
 
नियोजित दौऱ्यानुसार राज ठाकरे सकाळी मुंबईहून निघाले आणि ते पुण्यात पोहचले. पुण्यामध्ये नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या ४५ पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचं वाटप आणि आजी-माजी नगरसेवकांच्या भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र विभागीय आयुक्त आणि पालक मंत्री अजित पवार यांनी जी बैठक घेतली त्यानंतर त्यांनी आवाहन केलं आहे शाळा-कॉलेज बंद ठेवण्यात यावीत तसेच गर्दी टाळावी. पुण्यामध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी एवढ्या लोकांना एकत्रित बोलवून पत्रं देणं योग्य दिसणार नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळले गेले पाहिजेत. म्हणूनच या भेटीगाठींचं नियोजन रद्द करण्यात आलं आहे, अशी माहिती वागस्कर यांनी दिली.