Dharma Sangrah

तज्ञांकडून टायफॉइड आणि कोरोनामधील फरक जाणून घ्या

Updated: शुक्रवार, 14 मे 2021 (19:59 IST)
गेल्या वर्षी खेड्यांमध्ये जागरूकता नव्हती. त्यांना समजत नाही की कोरोना म्हणजे काय? भारत हा खेड्यांचा देश असे म्हणतात परंतु खेड्यांमध्ये प्राणघातक आजाराबद्दल फारशी माहिती नाही. म्हणून कोरोनाच्या तपासणी नंतर टायफॉइडची तपासणी करा.
आजकाल कोरोनासमवेत टायफॉइड देखील होत आहे, तर मग टायफॉइड म्हणजे काय ते जाणून घेऊया? कसे ओळखावे याची लक्षणे कोणती? काय खबरदारी घेणे आवश्यक आहे.
 
टायफॉइड म्हणजे काय?
 
टायफॉइड पाचक प्रणाली आणि रक्तप्रवाहात संक्रमणामुळे होतो. टायफॉइड मध्ये, साल्मोनेला टायफी नावाचा एक बॅक्टेरिया  शरीरात प्रवेश करतो. सर्वप्रथम ते दूषित पाणी आणि अन्नाद्वारे प्रवेश करतो. हे पाचन तंत्रावर मोठ्या प्रमाणात परिणाम करतो.
 
* टायफॉइडची लक्षणे-
 
* थंडी लागून ताप येतो.
 
*संसर्गामुळे भूक न लागणे.
 
* अंगदुखी.
 
* शरीरावर लाल पुरळ येणं.
 
* आळस येणे.
 
- टायफाइडमध्ये, रुग्णाचा  तापाचा तपमान 102 ते 105 अंशांपर्यंत असतो.
 
टायफॉइड झाल्यास खबरदारी घ्या.
 
*  स्वच्छतेची काळजी घ्या.
 
*  कोमट पाणी प्या.
 
*  इतरांपासून अंतर ठेवा.
 
* कच्चे अन्न खाऊ नका, शिजविलेले अन्न खावे.
 
* स्वतंत्र खोली मध्ये रहा. जेणे करून संक्रमण पसरू नये.
 
*  भरपूर तरल द्रव प्या.
 
* आपले शरीर ओल्या कपड्याने पुसून घ्या. स्नान करू नका.
 
* ताप येत असेल  तर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवा.
 
टाइफाइडवर उपचार कसे शक्य आहेत?
 
टायफॉइडचा उपचार अँटीबायोटिक औषधाने शक्य आहे.  योग्य वेळी उपचार घेतल्यावरआठवड्यात एखाद्याला आराम मिळतो. खाण्या-पिण्याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. टायफाइड सुमारे 15 दिवस टिकतो. म्हणून, खबरदारी घेतल्याने लवकरच बरे होऊ शकतो.
 
आपण टायफाइडमध्ये घरगुती उपचार देखील वापरू शकता -
 
1 गिलोय पाणी  - गिलोय रात्रभर चार कप पाणी घालून भिजवा. सकाळी पाणी उकळवा म्हणजे एक कप पाणी राहील . ते पाणी अर्धा-अर्धा कप सकाळी संध्याकाळी प्या.
 
2 लसूण - लसूणची प्रकृती उष्ण आहे परंतुअँटी बायोटिक  आणि अँटीऑक्सिडेंटने समृद्ध असते . लसूण  तूपात भाजून घ्या आणि सेंधव  मीठ घाला आणि पाण्यासह एका लसणाची पाकळी द्या.
 
3. तुलसी आणि सूर्यमुखी - दोघांचा रस काढून प्यावे. तसेच एका भांड्यात तुळशीची पाने घाला आणि चांगली उकळवा आणि दिवसातून 3-4 वेळा प्या.
 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख