मानसिक आरोग्य : आनंदी राहण्याचा मंत्र, रोज फक्त 10 मिनिटं करा हा व्यायाम

BBC
Last Modified गुरूवार, 9 सप्टेंबर 2021 (08:50 IST)
- डेव्हिड रॉबसन
कॉफीचा एक कप संपवण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याहीपेक्षा कमी वेळात तुम्हाला सुदृढ आरोग्य मिळू शकतं, असं म्हटलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण मानसोपचारतज्ज्ञ आणि सेंट्रल लँकशायर विद्यापीठात लेक्चरर असलेल्या सॅन्डी मॅन यांनी असा उपाय शोधून काढला आहे. यासाठी तुम्हाला फक्त सहा प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहे.
वैद्यकीयदृष्ट्या कुठलाही गंभीर मानसिक आजार नसला तरी रोजच्या ताण-तणावामुळे बरेच जणांच्या आयुष्यातलं समाधान हरवत जातं. या ताणावर मात करण्यासाठी अनेक संशोधनं झाली आहेत. सुरूही आहेत आणि त्यातून तणाव दूर करण्यासाठी आधुनिक विज्ञानाने अनेक उपायही सांगितले आहेत.

वैद्यक शास्त्राच्या 'सकारात्मक मानसिकता' या शाखेला आता जवळपास 20 वर्षं पूर्ण झाली आहेत आणि याने आपला मूड चांगला करण्यासाठी अगणित तंत्र सांगितली आहेत.
पण, रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात हे उपाय कसे आत्मसात करायचे?

सॅन्डी मॅन यांच्याकडे यावर एक उपाय आहे. त्यांचा मानसोपचारतज्ज्ञ म्हणून आतापर्यंतचा जो अनुभव आहे, त्या आधारे त्यांनी काही उपाय शोधून काढलेत ज्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. Ten Minutes to Happiness या आपल्या पुस्तकात त्यांनी 6 प्रश्न सांगितले आहेत. या सहा प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वतःला द्या.

कोणत्या अनुभवांनी तुम्हाला आनंद झाला होता? (ते कितीही साधे असले तरी)
तुमची कुणी तुमची स्तुती करतं का? कोणत्या कारणासाठी?
तुम्ही खरोखर नशीबवान आहात, असं तुम्हाला कधी-कधी वाटलं?
कितीही छोटं असलं तरी तुम्ही मिळवलेले यश कोणतं?
कशामुळे तुमच्या मनात कृतज्ञतेची भावना येते?
तुम्ही तुमचा दयाळूपणा कसा व्यक्त करता?
हा उपक्रम शास्त्रीय संशोधनावर आधारित आहे. या संशोधनातून आढळून आलंय की तुम्ही तुमच्या प्रत्येक दिवसाचं या सहा प्रश्नांच्या आधारावर मूल्यांकन केल्यास तुमची मनोदशा हळूहळू बदलू लागते आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात अधिक आनंद मिळू लागतो.
जेव्हा आपल्या मनात निराशा दाटून येते, अशावेळी घडत असलेल्या चांगल्या गोष्टीही आपल्याला दिसत नाही. हे घडतं. मात्र, या प्रयोगात तुम्ही चांगल्या गोष्टी आठवता, त्यांच्याकडे तुमचं लक्ष वेधलं जातं.

मॅन यावरही भर देतात की तुम्ही या प्रश्नांची उत्तरं लिहिली की तुमचा मूड चांगला होतो. मात्र, इतकंच नाही तर भविष्यातही कठीण प्रसंगाचा सामना करण्यासाठी तुम्ही लिहून ठेवलेल्या पूर्वीच्या नोंदी वाचणं, तुम्हाला फायदेशीर ठरतं.
happy face
आपला मूड चांगला नसला की आपली 'associative memory' म्हणजेच सहकारी स्मरणशक्ती आपल्याला भूतकाळातले ताण किंवा दुःखद प्रसंगाची आठवण करून देते. असं जेव्हा घडतं तेव्हा तुमच्या नोंदवहीतली पानं चाळली की या दुःखद भावनांच्या दृष्टचक्रातून तुम्ही बाहेर पडता.
दया या भावनेमध्ये असलेल्या अपार शक्तीविषयी नुकतच्या करण्यात आलेल्या संशोधनाच्या आधारावर सहावा मुद्दा समाविष्ट करण्यात आला आहे. अनेक अभ्यासांमध्ये असं आढळलं आहे की निस्वार्थ कृतीमुळे तुमच्या आसपासच्या व्यक्तींना आनंद तर मिळतो, इतकंच नाही तर तुमचाही मूड चांगला होतो.

उदाहरणार्थ, एखाद्या अनोळखी व्यक्तीला मदत करण्यासाठी थोडे पैसे खर्च केल्याने तेवढेच पैसे तुम्ही स्वतःवर खर्च करून तुम्हाला जो आनंद मिळला असता त्याहून अधिक आनंद मिळतो. जवळपास 130 देशांमध्ये हे संशोधन करण्यात आलं आणि त्या सर्व संशोधनांमध्ये हेच परिणाम आढळले आहेत.
अशा प्रसंगांवर लक्ष केंद्रीत केल्यास तुम्हाला अधिकाधिक आनंद तर होतोच. शिवाय दुसऱ्या दिवशीही तुम्ही हाच आनंद पुन्हा मिळावा, यासाठी प्रयत्न करता. (या संशोधनाविषयीची अधिक माहिती तुम्ही BBC Future वर वाचू शकता.)

मॅन हेदेखील स्पष्ट करतात की दिवसभरात काय घडलं यावर दहा मिनिटं मनन केल्याने चमत्कार घडत नाही आणि एखाद्याला वाटलं की आपल्याला नैराश्य येऊ शकतं तर त्याने मानसोपचारतज्ज्ञाकडे जाऊन त्यांची मदत जरूर घेतली पाहिजे. मात्र, ज्यांना कधीकधी निराश वाटतं, ताण जाणवतो त्यांच्यासाठी या सहा स्टेप्स नक्कीच उपयोगाच्या आहेत.
ज्यांना मॅन यांचा हा दृष्टीकोन योग्य वाटतो ते त्यांचं Counterintuitive Research on Boredom हे संशोधनही वाचू शकतात. त्यांनी केलेल्या अनेक प्रयोगांती त्यांना असं आढळून आलंय की छोट्या-छोट्या कंटाळवाण्या कामांचे मोठे फायदे असू शकतात.

याविषयी केलेल्या एका प्रयोगात त्यांनी विद्यार्थ्यांना फोनबुक कॉपी करण्याचं कंटाळवाणं काम दिलं. या प्रयोगात असं आढळलं की ज्या मुलांना हे कंटाळवाणं काम दिलेलं नव्हतं त्यांच्यापेक्षा या मुलांची क्रिएटिव्हीटी वाढलेली होती. मॅन यांना वाटतं की अशा कंटाळवाण्या कामांमुळे विद्यार्थ्यांचं मन वळतं आणि ते स्वप्न बघण्यात रमतात आणि यातून त्यांची सर्जनशीलता वाढायला मदत होते.
happy faces
मॅन यांनी BBC Reel ला सांगितलं "तुम्हाला एखादी समस्या सोडवता येत नसेल तर थोडा वेळ काढून तुम्हाला कंटाळा आणणारं काम करा. असं केल्याने तुमच्या समस्येचं क्रिएटिव्ह सोल्युशन तुमच्या मेंदूत येऊ शकतं." हल्ली कंटाळा दूर करण्यासाठी सर्रास सोशल मीडियाचा आधार घेतला जातो. अशावेळी ही पद्धत नक्कीच उपयोगी ठरू शकते. त्या म्हणतात, "आपण आपल्याला येणारा कंटाळा दूर करणं थांबवलं तर हे होऊ शकतं."
काही काळाने तुमच्या लक्षात येईल की तुमची सहनशक्तीही वाढली आहे आणि पूर्वी जेव्हा तुम्हाला प्रतीक्षा करणं सर्वांत क्लेशकारक वाटायचं आता हाच वेळ तुम्हाला शांत आणि आत्मचिंतन करण्यासाठीची संधी वाटू लागेल.

त्या म्हणतात, "विचित्र वाटेल, मात्र, कंटाळा दूर करण्याचा सर्वोत्तम मार्ग हा तुमच्या आयुष्यात कंटाळ्याला जास्तीत जास्त वेळ देणे, हाच आहे."


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

HRTC Recruitment 2021 हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट ...

HRTC Recruitment 2021 हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनमध्ये 332 ड्रायव्हर पदांसाठी भरती
हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (HRTC) ने 332 ड्रायव्हर पदांच्या भरतीसाठी पात्र आणि ...

सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकरने 5 विंटर फूड शेअर ...

सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकरने 5 विंटर फूड शेअर केले
हिवाळ्यात अनेक आरोग्यदायी आणि पौष्टिक अन्नपदार्थ उपलब्ध होतात. संपूर्ण बाजारपेठ हिरव्या ...

Delicious Rice Donuts Recipe :उरलेल्या भातापासून चविष्ट ...

Delicious Rice Donuts Recipe :उरलेल्या भातापासून चविष्ट डोनट्स बनवा
संध्याकाळच्या चहासोबत थोडा नाश्ता मिळाला तर आनंदच आहे. बऱ्याचदा घरात जास्तीचा भात बनतो. ...

Mother-Daughter Relationship :प्रत्येक आईने आपल्या मुलीला ...

Mother-Daughter Relationship :प्रत्येक आईने आपल्या मुलीला या चार गोष्टी सांगाव्यात, आयुष्य सोपे होईल
नातेसंबंधांच्या बाबतीत, आईचे तिच्या मुलांशी सर्वात प्रेमळ आणि खरे नाते असते. मुलगा असो वा ...

Motivational Story – नैतिक शिक्षणाचे महत्त्व

Motivational Story – नैतिक शिक्षणाचे महत्त्व
आचार्य विनोबा भावे यांचं अनेक भाषांवर प्रभुत्व होते. विविध धर्मांचे साहित्य, मतभिन्नता ...