शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: मंगळवार, 7 सप्टेंबर 2021 (16:44 IST)

महिलांमध्ये मूत्रमार्ग संसर्ग

जवळपास ६०% स्ञियांना आयुष्यात एकदा तरी युरिनरी ट्रेक्ट इन्फेक्शन (UTI) चा त्रास होतोच .
शरीरातील पचन क्रियेनंतर राहिलेले बँक्टेरिया कोणत्या तरी माध्यमातून युरेथ्राच्या थरावर चिटकून राहतात आणि त्यातूनच मुञमार्ग संसर्ग निर्माण होतो. मुञाशयाच्या मार्गावरील कोणत्याही भागास (UTI) हा संसर्ग होण्याचा संभव असतो. ज्यात मुञप्रणालीमधील किडनी (मुञ बनविण्यासाठी रक्तामधून नको असलेले घटक वेगळे करते), युरेटर्स (किडनीतून मुञाशयापर्यंत मुञ वहन करतो ), मुञाशय (मुञ साठवले जाते) आणि युरेथ्रा (तुम्ही शौच करता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये मुञाशयामधून मूञ पाठवण्याचे काम करणारी लहान नळी-ट्यूब) या चार घटकांचा समावेश होतो.
 
या जीवाणूंचा प्रार्दुभाव होण्यास अनेक कारणे आहेत. हे जीवाणू आपल्या शरीरात काही ठिकाणी नांदत असतात. आपल्या मोठया आतड्यात असलेले हे जीवाणू मुञाशयाच्या जवळ असल्याने, काही हालचालींमुळे मुञमार्गात प्रवेश करतात. शौच झाल्यानंतर गुदभाग धूताना, पाठीमागून पुढचा भाग पुसल्याने जंतू युरेथ्रामध्ये ढकलले जातात. तसेच, संभोगादरम्यानदेखील जीवाणू युरेथ्रामध्ये ढकलले जातात. यांवर स्परमिसाईड्स (शुक्राणूनाशक औषध) किंवा डायफेम (diaphragm) म्हणजे गर्भनिरोधक औषधे मुञमार्ग संसर्ग (UTIs) वर उपाय म्हणून वापर होण्याची शक्यता असते. 
 
मुञाशय खाली करण्यासाठी अडथळा आणणारी कोणतीही कडक वस्तू म्हणजे मुतखडा (kidney Stone)चा ञास डायबिटीसच्या रूग्णांना होण्याची दाट शक्यता असते. ॲस्ट्रोजन (एक हार्मोन)च्या अभावामुळे रजोनिवृत्तीनंतर (menopause) योनीमार्गामध्ये फेरफार होतो.
 
UTIs संसर्गाचे प्रकार कसे ओळखाल
मुञोत्सर्जन करतेवेळी असहाय वेदना होणे, दाह होणे, सतत लघवीला होणे, मुञाशय सतत भरल्यासारखे वाटणे तसेच, लघवीला गेल्यास न होणे.
ओटीपोटात दुखणे 
लघवीचा उग्र वास, रंग गडद आणि दुधासारखी घट्ट होणे
लघवीमध्ये रक्ताचे प्रमाण दिसणे.
वरीलपैकी कोणतेही लक्षणे आढळल्यास, तसेच ताप आणि थंडी येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
तुम्ही UTI समस्यांनी ग्रस्त आहात की नाही, ह्याची योग्य मुञ तपासणी डॉक्टरांद्वारे केली जाते. दरम्यान, डॉक्टर कींवा नर्स तुम्हांला निर्जंतूक केलेला प्लास्टिकचा कप किंवा बाटली देतील. आपल्या मुञाचा नमुना ह्या कपात देण्याआधी हात स्वच्छ असावेत, तसेच कपाच्या आतील बाजूस स्पर्श न करता, मुत्र सहज पोहोचेल असे धरा. तत्पुर्वी, दुसऱ्या हाताने लेबिया (योनीमार्गावरील चांबडी) वर करून गुप्तांग स्वच्छ करा. ज्यामुळे डॉक्टरांना ‘क्लीन केच’ नमुना मिळण्यास मदत होईल. जर तुम्ही UTIs ने पीडीत असाल तर डॉक्टर एक्स-रे आ अल्ट्रा साऊंडद्वारे तुमची युरिनरी ट्रेक्ट तपासणी करतील. एक्स-रे द्वारे मुतखडा आणि ब्लॉकेज दिसून येतात. डॉक्टर सिस्टोस्कोपचा उपयोग करून मुत्राशयाच्या अंतर्गत भागाची देखील तपासणी करू शकतात. 
UTIs ची बाधण झाली असेल तर कोणत्याही ॲन्टीबायोटिक्स औषधे घेण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. ह्यामध्ये हलगर्जी दाखवल्यास विषाणू युरिनरी ट्रेक्टने मुत्राशय आणि किडनीपर्यंत पोहोचू शकतो. ज्याने गंभीर आजार होऊ शकतात. 
 
UTIs टाळण्यासाठी खालील उपाय महत्त्वाचे 
लघवी व होत असेल तर लागलीच जावे, अधिक काळ थांबवून ठेवू नका.
संभोग झाल्यानंतर लघवी करा.
शौच करून झाल्यानंतर मुत्राशय आणि गुदाशयची जागा स्वच्छ करा.
दिवसभरात ६ ते ८ ग्लास दररोज पाणी प्या.
योनीमार्गावरील बाहेरील त्वचा आणि गुदाचा भाग दररोज धुवा.
डाऊचीस तसेच हायजीन स्प्रे चा वापर टाळा. गुप्तांगाच्या जवळपास भागांवर अत्तर कींवा संभावित एलर्जी होणाऱ्या उत्पादनाचा वापर करू नका.
UTIs समस्येने बेजार झाला असाल तर वीर्याला मारणारे स्पर्मिसाईड अथवा क्रिम वापरू शकता. त्यासाठी संतती नियमन स्वरूपांचा वापर करण्यासाठी संबंधित तज्ञशी संपर्क साधा.
सुती अंतवस्ञ परिधान करा. जास्त टाईट फिटींगच्या पँटी घालू नका, ज्यामुळे जखम होईल.
टबमध्ये स्नान करण्याएवजी शॉवरबाथ घ्या.
एकापेक्षा अधिक व्यक्तींबरोबर समागम टाळा. त्यामुळे इतर शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागेल. ज्यात सेक्श्युअली ट्रान्समिटेड डिसीझीज (STD) आणि UTIs चा समावेश होतो.
मूञ संसर्ग वारंवार होत असेल तर ते टाळण्यासाठी अनेक घरगुती उपचार सुचविले आहेत. 
 
अधिक महत्त्वाचे 
जर तुम्हांला वारंवार UTIs ची बाधा होत असेल तर, तुमचे मुञमार्ग साफ होत नाहीय, हे लक्षात घ्या. त्यासाठी पाण्याचे प्रमाण जास्त करा.
सकस आहार घ्या. क्रेनबेरिज, ब्ल्यूबेरिज, लिगननबेरिज आणि अननस यांसारखे फळं खाल्यांमुळे मूञमार्ग साफ होण्यास मदत होते. तसेच, सकाळी नियमित न्याहारी केल्याने स्मूधिसचा समावेश होतो.
 
क्रेनबेरीचा रस UTIs समस्यांसाठी घरगुती उत्तम उपाय आहे.
भरपूर पाणी प्या. त्यात लिंबाचे तेल (लेमन इसेंशियल ओईल)चा एक थेंब टाका. लेमनग्रास, जेरेनियम, बर्गामोट, चंदन, मेलेल्युका इ. ने बनविलेले तेल विषाणू विरोधी, वायरल विरोधी, सेप्टीक विरोधी म्हणून ओळखली जाते. 
वारंवार उपचार करून देखील संसर्ग परत परत होत असेल, तर वेळीच काळजी घ्या. तुम्ही जर गरोदर असाल, कींवा घरात आपल्या समस्या व्यक्त न करता येऊ शकणारे लहान मुलं, वृद्ध तसेच दुर्धर आजारी व्यक्तीं असतील, आणि त्यांना वारंवार ताप, चक्कर,उलटी येणे, थंडी लागणे, किडनीजवळ दुखणे, असे जर लक्षणे दिसत असतील तर लगेचच डॉक्टरांकडे जा.
 
उपचार करूनही वारंवार होणाऱ्या संसर्गाकडे दुर्लक्ष करू नका. ञासदायक विषाणूंकडे केलेलं दुर्लक्ष पण तुमचे मुञाशय आणि किडनी सहित तुमच्या मुञमार्गाला गंभीर  स्वरूपाचा आजार देऊ शकतात. वेळेत उपचार करा नाहीतर छोट्या हलगर्जीमुळे सर्वकाही हातातून जाऊ शकते. 
 
डॉ. समर गुप्ते,
कन्सलटंट स्ञीरोग तज्ञ आणि कर्करोग विशेषतज्ञ